भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव, एका विषाणूचा किती जणांना संसर्ग, काय खबरदारी घ्यावी ?

विषाणूचा संसर्गदर काय आहे ? तो किती संहारक आहे, यावर तज्ज्ञांकडून संसोधन सुरु आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा एक विषाणू तब्बल 35 जणांना बाधित करु शकतो, असे प्राथमिक अभ्यासातून समोर आले आहे.

भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव, एका विषाणूचा किती जणांना संसर्ग, काय खबरदारी घ्यावी ?
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : संपूर्ण जगाची झोप उडवणारा कोरोनाचा नवा अवतार अर्थात ओमिक्रॉन या विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले दोन कोरोनाबाधित आढळले आहेत. या रुग्णांवर आता उपचार सुरु करण्यात आलेयत. भारतात या विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या विषाणूचा संसर्गदर काय आहे ? ( omicron transmission rate) तो किती संहारक आहे, यावर तज्ज्ञांकडून संसोधन सुरु आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा एक विषाणू तब्बल 35 जणांना बाधित करु शकतो, असे प्राथमिक अभ्यासातून समोर आले आहे.

एका ओमिक्रॉन विषाणूचा 35 जणांना संसर्ग

ओमिक्रॉन या विषाणूमुळे पूर्ण जगात घबराट निर्माण झाली आहे. या विषाणूच्या संसर्गाविषयी सध्या संशोधन आणि अभ्यास करण्यात येत आहे. मात्र प्राथमिक अभ्यासातून काही  निष्कर्ष समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन हा विषाणू कोरोनच्या डेल्टा या रुपापेक्षाही जास्त संसर्ग पसरवतो. ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत तब्बल 500 टक्के जास्त संसर्गक्षम आहे. कोरोनाचा मूळ विषाणू तीन जणांपर्यंत संसर्ग पसरवू शकतो. तर डेल्टा व्हेरिएंट सात जणांवर हल्ला करु शकतो. मात्र ओमिक्रॉन हे कोरोनाचा नवे रुप तब्बल 35 जणांना बाधित करु शकते. म्हणजे त्याचा संसर्गदर हा अल्फा, डेल्टा आणि मूळ कोरोना विषाणूच्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त आहे.

काय खबरदारी घ्यावी ?

ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्यास नेमकी कोणती उपचारपद्धती असावी हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून अभ्यास सुरु आहे. त्यामुळे खबरदारी घेणे हाच ओमिक्रॉनपासून वाचण्याचा नामी उपाय आहे. बाहेर जाताना मास्क वापरणे, हात निर्जंतूक करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

कर्नाटकात ओमिक्रॉनबाधित दोन रुग्ण

दरम्यान, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढे आहेत.

इतर बातम्या :

diva dumping ground: नाकात दम आणणारा दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड हटवला जाणार, 14 वर्षानंतर दिवेकरांची वनवासातून सुटका

Prashant Kishor: काँग्रेसचा 10 वर्षात 90 टक्के पराभव, विरोधकांचं नेतृत्वं करणं हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही; प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल

चैत्यभूमीवर सुरक्षाविषयक कामे पूर्ण, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI