AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron : केवळ 96 तासात देशातल्या 5 राज्यांत ओमिक्रॉन पसरला, देशाची चिंता वाढली

भारतात ओमिक्रॉनच्या फैलावानंतर जिल्ह्या-जिल्ह्यांत नवे नियम लागू होतायत. पुण्यात चित्रपटगृह आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 टक्के उपस्थितीची अट घातली गेलीय. परदेशातून येणाऱ्यांना 7 दिवस घरातच क्वारंटाईन सक्तीचं केलं गेलंय.

Omicron : केवळ 96 तासात देशातल्या 5 राज्यांत ओमिक्रॉन पसरला, देशाची चिंता वाढली
Omicron cases
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 9:44 PM
Share

मुंबई : फक्त 96 तासात देशातल्या 5 राज्यांत ओमिक्रॉन पसरलाय. 2 डिसेंबरला कर्नाटकात 2 ओमिक्रॉन बाधित निघाले. नंतर 4 तारखेला गुजरातच्या जामनगरमध्ये एक रुग्ण, 4 तारखेच्या संध्याकाळी कल्याण-डोंबिवलीत एक रुग्ण, आणि यानंतर दिल्लीत एक व्यक्ती ओमिक्रॉन बाधित आलाय. यापैकी कल्याण-डोंबिवलीतला जो ३३ वर्षीय तरुण बाधित झालाय, त्याला फक्त हलका ताप आहे. इतर कोणतीही लक्षणं नाहीत. तो काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आला होता. सध्या त्याला कल्याणच्या कोव्हिड सेंटरमध्ये भर्ती करण्यात आलंय. मात्र त्यानं अद्याप कोरोनाची एकही लस घेतलेली नाही. कोरोनाचा एकही डोस न घेता या तरुणानं दक्षिण आफ्रिकेतून भारताचा प्रवास कसा केला, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होतंय. दरम्यान, या तरुणाच्या संपर्कात आलेल्या 34 लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेयत.

ओमिक्रॉनच्या रुग्णांना गंभीर लक्षणं नाहीत

गुजरातमध्ये सापडलेला 72 वर्षीय व्यक्तीलाही हलकी सर्दी आणि ताप आहे. इतर गंभीर लक्षणं नाहीत. 28 नोव्हेंबरला हा व्यक्ती झिम्बाब्वेमधून गुजरातला आला होता. सध्या या व्यक्तीला जामनगरच्या रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही या व्यक्तीला पुन्हा ओमिक्रॉनची लागण झालीय. या व्यक्तीच्या संपर्कात 10 लोक आली आहेत, त्यांच्या रिपोर्टची अद्याप प्रतीक्षा आहे. दिल्लीतल्या 37 वर्षीय ओमिक्रॉन बाधिताला घश्यात खवखव आणि अंगदुखीचा त्रास आहे. मात्र इतर गंभीर लक्षणं नाहीत. हा व्यक्ती टांझनियामधून दिल्लीत आलाय. सध्या त्याच्यावर दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार या व्यक्तीनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यामुळेच गंभीर लक्षणं दिसलेली नाहीत. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 5 लोकांची चाचणी झालीय. मात्र त्यांना सामान्य कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

लसीचे दोन डोस घेऊनही ओमिक्रॉन

आतापर्यंत देशातल्या पाच ओमिक्रॉनबाधितांपैकी 4 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेयत. मुंबईतला तरुण त्याला अपवाद आहे. मात्र चांगली गोष्ट म्हणजे या पाचही जणांमध्ये ज्यात एका 72 वर्षीय व्यक्तीचाही समावेश आहे, त्या सगळ्यांना कोणतीही गंभीर लक्षणं नाहीत. जाणकारांच्या मते लस घेऊनही ओमिक्रॉन होत असला, तरी लसीमुळेच ओमिक्रॉनची तीव्रता कमी आहे.

जिल्ह्या-जिल्ह्यांत नवे नियम लागू

भारतात ओमिक्रॉनच्या फैलावानंतर जिल्ह्या-जिल्ह्यांत नवे नियम लागू होतायत. पुण्यात चित्रपटगृह आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 टक्के उपस्थितीची अट घातली गेलीय. परदेशातून येणाऱ्यांना 7 दिवस घरातच क्वारंटाईन सक्तीचं केलं गेलंय. नागपूर विमानतळावर आलेल्या प्रत्येक कोव्हिड चाचणी बंधनकारक असेल. कर्नाटकात फैलाव झाल्यानंतर सीमालगतच्या भागात सोलापूर प्रशासनानं तपासणी नाके उभारले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये दोन डोसशिवाय प्रवेश नाहीय. आणि लग्नकार्यांना 50 टक्के उपस्थितीची अट लावण्यात आलीय. रत्नागिरीतले काही कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. गणपतीपुळे मंदिरात लस घेतलेल्या लोकांनाच प्रवेश मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यात इतर राज्यांमधून येणाऱ्यांना कोरोना चाचणीनंतरच जिल्ह्यात प्रवेश असणार आहे.

मुंबईसाठी चिंतेची बाब म्हणजे धारावीत आफ्रिकेतून आलेला एक व्यक्ती कोरोनाबाधित आलाय. मात्र तो नेमका कोणत्या व्हेरियंटनं बाधित झालाय, त्याचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. जगाचा विचार केला तर 10 दिवसात 35 देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झालाय. आतापर्यंत जगभरात 400 हून जास्त लोकांना ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय. मात्र ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाल्याची अद्याप तरी माहिती समोर आलेली नाही. ओमिक्रॉन बाधित बहुतांश रुग्णांना सर्दी, तापसारखी सामान्य लक्षणं आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या…

शिवेसना पदाधिकाऱ्याचा कारनामा, स्वत:वर गोळीबार झाल्याचा रचला कट, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune | इंदापूर-बारामती रोडवर अपघात, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अपघातग्रस्तांना मदत

Girish Kuber| समाजाचे अवैचारिकरण, प्रगल्भतेची आस आहे का, कुबेरांचा सवाल; पत्रकारिता सत्य विसरली, डोळेंचे खडे बोल!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.