AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचे उमेदवार निवडून आल्यावर मोदींसोबत जाणार; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठी गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार काय, निवडून आले तर मोदींच्या सोबतच जाणार आहेत, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने एकच खळबळ माजली. बीडमध्ये वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हा गौप्यस्फोट केला

शरद पवारांचे उमेदवार निवडून आल्यावर मोदींसोबत जाणार; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: May 09, 2024 | 12:29 PM
Share

लोकसभा निवडणुकीचं मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला असून आता राजकीय वातावरणही तापले आहे. विविध पक्षांच्या प्रचारसभानांही वेग आला आहे. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठी गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार काय, निवडून आले तर मोदींच्या सोबतच जाणार आहेत, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने एकच खळबळ माजली. बीडमध्ये वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

बीड जिल्ह्याची निवडणूक रंगात आलेली आहे. बजरंग सोनावणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवस इथे थांबणार आहेत. कालच्याच पत्रकार परिषदेत शरद पवारांना पक्षाच्या वतीने आम्ही विचारलं की, आपण एका बाजूला म्हणत आहेत की, भाजपला हरवलं पाहिजेत, सत्तेपासून खाली खेचलं पाहिजेत. उद्या आपण तेच वाक्य वापरणार याची मला खात्री आहे. पण राजनाथ सिंह यांना आपण फोन का केला होता याचे उत्तर तुम्ही अजून दिलेले नाही असा सवाल आंबेडकर यांनी विचारला.

राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते आहे, त्यामुळे हा सुध्दा वजनदार माणूस आहे. या माणसाला आपण अचानक फोन का केलात ? काय बोलणे झाले ? लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची चर्चा झालीय का ? आणि तसे असेल, तर इथल्या मतदारांनी ते लक्षात घ्यावे की, भाजपचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार काय, निवडून आले तर मोदींच्या सोबतच जाणार आहेत. उद्या फसवले जाणार नाहीत, यासाठी मी इथल्या मराठा समाजाला आवाहन करतोय की, त्यांनी बजरंग सोनावणे यांना मतदान करू नये, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका घेतलीय का ? नरेंद्र मोदीने भूमिका घेतलीय का ? तर अजिबात घेतली नाही. जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभे केले, लाखो गरीब मराठा त्यांच्या पाठीशी आपल्या व्यथा घेऊन उभा राहिला. जरांगे पाटील यांनी उभे केलेलं आंदोलन नवीन आहे असे मी मानत नाही. १९८० पासून अण्णाराव पाटील यांनी उभे केलेलं आंदोलन, त्यानंतर शशिकांत पवार, त्यानंतर छावा संघटना, जिजाऊ संघटना यांना मोडायचे काम कोणी केले असेल, तर महाराष्ट्रातील एकमेव शरद पवार हे आहेत. शरद पवारांनी सगळ्या पुरोगामी चळवळी संपवल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोदींवरही केली टीका

ययावेली प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि मोदींवरही टीका केली. भारतीय जनता पक्ष पूर्णपणे बरबटलेला पक्ष आहे. आम्ही एससी, एसटीचे आरक्षण काढणार नाही असे ते म्हणतात. ही घटना जोपर्यंत राहील तोपर्यंत एससी, एसटीचे आरक्षण राहिलं ते कोणाला काढता येणार नाही. शिक्षण आणि सेवा यामधील आरक्षण कोणाला काढता येत नाही. असा ईशाराही त्यांनी दिला. संविधान बदलले पाहिजे, ही भूमिका नरेंद्र मोदींची आहे. संविधान बदललं तर आरक्षण गेले आणि आरक्षण गेले हे लक्षात घ्या. मोदीसारखा खोटारडा माणूस दुसरा कोणीच नाही. जो माणूस स्वतःला देशापेक्षा मोठे मानतो. आणि त्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आणि आरएसएसमध्ये हिंमत नाही की, त्याला विचारावं आणि रोखावं. अशा संघटनेच्या हातात या देशाची सत्ता जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.