AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! फुटीर खासदारांच्या गटाचे प्रमुख कोण? सर्वात मोठी अपडेट काय? ते नाव अखेर समोर

विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर शिवसेनेच्या सहा फुटलेल्या खासदारांच्या नेत्याची घोषणा होणार आहे. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांना या गटाचा प्रमुख नेता म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

मोठी बातमी! फुटीर खासदारांच्या गटाचे प्रमुख कोण? सर्वात मोठी अपडेट काय? ते नाव अखेर समोर
खासदार संजय जाधव, गट नेता, फुटीर खासदार, उद्धव ठाकरे शिवसेना
| Updated on: Jun 18, 2026 | 1:12 PM
Share

MP Sanjay Jadhav Will be the leader of the faction of rebel MPs: सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंडाळी केल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज पक्षाने सर्व 9 खासदारांसाठी बैठक बोलावली होती. त्यासाठी व्हिप बजावला होता. पण 6 खासदारांनी व्हिपही झुगारला आणि बैठकीला दांडीही मारल्याचे स्पष्ट झाले. आता बंडखोरांचे नेतृत्व कोण करेल? कोण त्यांचा कॅप्टन असेल याची चर्चा रंगली आहे. तर परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव हे गटाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंडू जाधव यांना या बंडखोरांचा या गटाचा प्रमुख नेता म्हणून घोषीत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे.

संजय जाधव गट नेता

ताज्या अपडेटनुसार, विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर उद्धव सेनेच्या सहा फुटलेल्या खासदारांचा गट स्थापन करण्यात येऊन त्याचा गटनेता ठरवला जाईल. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव हे या गटाचे प्रमुख नेता असतील. ते या सर्व सहा आमदारांच्या गटाने नेतृत्व करतील. यापूर्वी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे या गटाचे कॅप्टन तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर व्हाईस कॅप्टन असल्याचा दावा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केला होता. पण आता नाट्यमय घडामोडी घडत फुटीर खासदारांचे नेतृत्व खासदार संजय जाधव करणार असल्याचे समोर येत आहे.

कोण आहेत संजय जाधव?

संजय जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मशाल तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. जाधव यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना शाखा प्रमुख म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी परभणी नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक झाले. पुढे त्यांना पक्षाने जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. 2004 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. 2009 मध्ये सुद्धा ते निवडून आले. त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. 2014 मध्ये पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये ही त्यांना उमेदवारी मिळाली. तर 2024 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी पुन्हा दिल्ली गाठली. आता त्यांनी बंडाचा झेंडा हातीच घेतला नाही. तर ते बंडखोरांच्या स्वतंत्र गटाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संजय जाधव यांना वाय प्लस सुरक्षा

आताच हाती आलेल्या माहितीनुसार, परभणीचे खासदार संजय जाधव यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांनी उद्धव सेनेत बंड पुकारल्यानंतर गृह विभागाने त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. परभणीचे अतिरिक्त पोलीस अधिकारी तान्हाजी चिखले यांनी ही माहिती दिली आहे. तर परभणीतील संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या या बंडखोरीवर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले