सकाळी देशमुखांना व्हायरल क्लीनचीट, सायंकाळी परबांना 100 कोटी वसुलीची ईडी नोटीस, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अनिल परब यांना नोटीस मिळाली आहे की नाही, याची कल्पना नाही. ईडी किंवा सीबीआय हे सर्व त्यांच्या परीने काम करतात, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

सकाळी देशमुखांना व्हायरल क्लीनचीट, सायंकाळी परबांना 100 कोटी वसुलीची ईडी नोटीस, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra-Fadnavis
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 10:12 PM

नागपूर  : परिवहनमंत्री अनिल परब ( Anil Parab) यांना ईडीची नोटीस (anil parab ed notice) आल्यानंतर ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. मात्र, याच नोटिशीबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अनिल परब यांना नोटीस मिळाली आहे की नाही, याची कल्पना नाही. ईडी किंवा सीबीआय हे सर्व त्यांच्या परीने काम करतात, असं फडणवीस म्हणाले आहेत. (opposition leader devendra fadnavis comments on anil parab ed notice said do not know anything)

अनिल परब यांना मिळालेल्या ईडी नोटिशीची कल्पना नाही  

देवेंद्र फडणवीस आज (29 ऑगस्ट) नागपुरात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनिल परब यांना मिळालेली ईडी नोटीस तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख एफआरआय रद्द प्रकरण यावर सविस्तर भाष्य केलं. अनिल परब यांनी ईडीची नोटीस मिळालेली आहे की नाही, याची मला कल्पना नाही, असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे अनिल देशमुख यांच्यावर भाष्य केले.

अनिल देशमुख यांना क्लीनचीट मिळाल्याच्या व्हायरल बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI च्या प्राथमिक तपासात क्लिनचिट मिळाल्याच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यावर बोलताना अशा बातम्या पेरून काहीही होणार नाही. सगळं कायद्यानुसार व्हायला पाहिजे, असे देवेंद्र फडणीस म्हणाले.

बातम्या पेरून कोणाचाही फायदा होणार नाही

“अनिल देशमुख क्लीनचीट संदर्भात सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. क्लीनचीट मिळाल्याची बातमी ज्या व्यक्तीच्या नावाने व्हायरल होत आहे, त्याच व्यक्तीच्या सहीने एफआयआर दाखल झाले आहे. सीबीआय एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. सीबीआयने जेव्हा या प्रकरणी एफआयआर केला, तेव्हा एफआयआर रद्द करण्याची मागणी केली गेली. नंतर हे प्रकरण हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेले. तरीही एफआरआय रद्द करण्यात यश मिळाले नाही. अशा बातम्या पेरून कोणाचाही फायदा होणार नाही. आता जे काही आहे ते नियम आणि कायद्याने झाले पाहिजे. हा कुणा व्यक्तीचा प्रश्न नाहीये. शेवटी कायद्याचा प्रश्न आहे. जे काही कायद्याने आहे ते होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनिल पबर यांना ईडीची नोटीस

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

ईडीची ‘100 कोटी वसुलीची नोटीस’, अनिल परब मात्र फार फार 60 शब्द बोलून निघून गेले

आता शिवसेनेचा स्वबळाचा नारा, राऊत म्हणतात, मुंबईच नाही तर महाराष्ट्र जिंकता आला पाहिजे!

अनिल परबांना ईडीची नोटीस, राऊत म्हणतात, वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं, नॉर्मल माणसं लढाया लढतात

(opposition leader devendra fadnavis comments on anil parab ed notice said do not know anything)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.