AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी साखळी आंदोलन, शेतकरी, सभासद आणि कामगार रस्त्यावर उतरणार

उस्मानाबाद जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करावा, या मागणीसाठी शेतकरी, सभासद आणि कामगार एकवटले आहेत.

तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी साखळी आंदोलन, शेतकरी, सभासद आणि कामगार रस्त्यावर उतरणार
Terana Sugar Factory
| Updated on: Feb 12, 2021 | 4:08 PM
Share

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला ढोकी येथील (Farmers Labours Demand To Reopen Terna Sugar Factory) तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करावा, या मागणीसाठी शेतकरी, सभासद आणि कामगार एकवटले आहेत. तेरणा कारखाना बचाव संघर्ष समितीच्या वतीने 22 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारीला ढोकी येथे रास्ता रोको तर 28 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे (Farmers Labours Demand To Reopen Terna Sugar Factory).

तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी सर्व शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार आहेत. 2007 पासून हा कारखाना बंद असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेसह शेतकरी सभासद यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

सरकारने कारखाना सुरु व्हावा यासाठी पावले उचलावीत

शासनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेस घेतलेली 155 कोटींच्या थकहमी पैकी 16 कोटी रुपये दिल्यास भविष्य निर्वाह निधी कार्यलयाने कारखान्यास लावलेले सील निघून जाईल त्यामुळे कारखाना भाडेतत्वावर देण्यासह निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास आंदोलक शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकारने कारखाना सुरु व्हावा यासाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

Terana Sugar Factory

तेरणा साखर कारखाना

साखर कारखाना गेल्या 13 वर्षापासून बंद

तेरणा बचाव संघर्ष समितीमध्ये बिगर राजकीय सभासद शेतकऱ्यांचा समावेश असून हे 36 हजार शेतकरी आणि सभासद यांचे हक्क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्वावर देण्यास सकारात्मक आहेत. मराठवाड्यातील सर्वात पहिला सहकारी क्षेत्रातील जुना असलेला उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या 13 वर्षापासून बंद आहे.

हा कारखाना सुरु करण्यासाठी केवळ तीस कोटी रुपये निधीची आवश्यकता असून शासनाने थकहमी घेऊन तो सुरु करावा, अशी मागणी तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने ॲड. अजित खोत, संग्राम देशमुख, निहाल काझी, रवी गरड, गफार रशिद काझी, सतीश देशमुख, अमोल समुद्रे, अनंत देशमुख, राहुल वाकुरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

कारखाना बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ

तेरणा शेतकरी सहकारी कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे तर शेतकरी ऊस उत्पादन घटल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. तेरणा कारखान्याची जवळपास 400 एकर इतकी जमीन असून ती विकण्यास सभासदांचा तीव्र विरोध आहे. तर, कारखाना बंद असल्याने मशीनरी धूळखात पडून असून भंगार चोरीच्या घटना वाढत आहेत. कारखान्यावरील  कर्ज व व्याजाचा डोंगर एकीकडे वाढत असताना कारखाना बंद असल्याने मशिनरी आणि इतर बाबींचे मूल्यांकन कमी होत आहे (Farmers Labours Demand To Reopen Terna Sugar Factory).

राजकीय कुरघोड्यामुळे हा कारखाना बंद

तेरणा कारखान्यावर एकेकाळी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आणि त्यानंतर शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, कर्जबाजारीपणामुळे आणि राजकीय कुरघोड्यामुळे हा कारखाना अखेर बंद पडला आहे. डॉ. पाटील परिवाराच्या भाजप प्रवेशानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली असून शेतकऱ्यांची लक्ष्मी असलेला हा कारखाना सुरु होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची आणि सरकारची सकारात्मक इच्छाशक्ती गरजेची आहे.

अतिवृष्टीच्या पाहणीवेळी शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा केल्यानंतर तुळजापूर येथे पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी पाऊस जास्त झाल्याने उसाचे क्षेत्र वाढल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न उपस्थित केला होता व तेरणा कारखाना सुरु करणे तितके सहज सोपे नसल्याचे सांगितले होते. पवारांचा सहकार व साखर उद्योगात दांडगा अभ्यास असल्याने तेरणा सुरु करणेबाबत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Farmers Labours Demand To Reopen Terna Sugar Factory

संबंधित बातम्या :

VIDEO: कारभारी लयभारी… मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपेक्षा भारदस्त, अहमदनगरमध्ये सरपंचाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

धक्कादायक ! मॅनहोलमध्ये लपलंय काय? तब्बल 21 लाखांचं सोनं, पोलीसही हैराण

Corona Positive | बापरे! कोरोना रुग्ण थेट रुग्णालयातून ग्रामपंचायतीत; सरपंचपदाच्या निवडणुकीत भाग

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.