अब की बार महिला सरकार; चिंचपूर गावचा कारभार महिलांच्या हाती

सर्वसामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला कारभार चालवणार आहेत. | Chinchpur Gram panchyat

  • संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, उस्मानाबाद
  • Published On - 13:11 PM, 15 Feb 2021
अब की बार महिला सरकार; चिंचपूर गावचा कारभार महिलांच्या हाती
सर्वसामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला कारभार चालवणार आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाची रस्सीखेच सुरु असताना चिंचपूर हे गाव आदर्श निर्माण करून देत आहे.

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील चिंचपूर (बु) या ग्रामपंचायतच्या सत्तेच्या चाव्या सावित्रीच्या लेकीच्या हाती आल्या आहेत या ग्रामपंचायतीचा कारभार आता महिला पाहणार आहेत. परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु) येथील ग्रामपंचायतवर 70 वर्षाच्या इतिहासात प्रथमच भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. भाजपने ही सत्ता 7- 4 च्या फरकाने खेचून आणली व महिलांच्या हाती कारभार दिला.(gram panchayat administration in hands of womens in Maharashtra)

सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडलेले असताना देखील गावाने महिला सबलीकरणाचा विचार सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने भाजपच्या जनशक्ती परिवर्तन पॅनलच्या प्रमुख परंडा पंचायत समिती सदस्या सौ.अश्विनी सतिश देवकर यांनी ग्रामपंचायतच्या सत्तेच्या चाव्या सावित्रीच्या लेकीच्या हाती देऊन नारी शक्तीचा मोठा सन्मान केला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला कारभार चालवणार आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाची रस्सीखेच सुरु असताना चिंचपूर हे गाव आदर्श निर्माण करून देत आहे.

सरपंचपदी प्रियंका पोपट शिंदे तर उपसरपंचपदी द्वारकाबाई गोवर्धन सावंत यांची वर्णी लागली. तर शितल दत्तात्रय सुतार, भाग्यश्री भारत देवकर, विद्या प्रकाश सावंत, महेश भागवत देवकर, भगवत कोंडीबा शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

गावात 100 टक्के महिलाराज

कायद्याने महिलांना 50%आरक्षण दिले आहे पण आज चिंचपूर (बु) ग्रामपंचायतीत 100% महिलाराज केले आहे, फुलांच्या पायघड्या घालून विजयी महिलांचे गावकयांनी स्वागत करीत महिला सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला. भाजपाचे सर्वसाधारण पुरुष जागेवर निवडुन आलेले महेश देवकर व भागवत शिंदे यांनी पदाची अपेक्षा न करता महिलांच्या हाती सत्ता देऊन आदर्श निर्माण केला आहे.

आमदार सुजितसिंह ठाकूर व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाने व भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील,भाजयुमो तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता भाजपाने 7- 4 च्या फरकाने खेचून आणली. सरपंच निवडीनंतर यानंतर ग्रामस्थांच्या वतीने उमेदवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हाअध्यक्ष नितीन काळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

संबंधित बातम्या :

कारभारी लयभारी… मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपेक्षा भारदस्त, अहमदनगरमध्ये सरपंचाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

ग्रामपंचायतचा ‘नगरी पॅटर्न’, आजोबा, वडिलांनतर आता बायको, 55 वर्षे सरपंचपद भूषवणारं कुटुंब

(gram panchayat administration in hands of womens in Maharashtra)