Vasai Crime : वसईत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, स्थानिकांकडून आरोपीची धिंड

Vasai Crime : वसईत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, स्थानिकांकडून आरोपीची धिंड
वसईत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, स्थानिकांकडून आरोपीची धिंड
Image Credit source: TV 9

पीडित 10 वर्षाची मुलगी आज सकाळी 10 च्या सुमारास दुकानात सुट्टे पैसे आणण्यासाठी गेली होती. यावेळी तेथे दुकानाच्या बाजूला उभ्या असलेल्या आरोपीने मुलीला बोलावले आणि सुट्टे पैसे देतो असे सांगून पीडित मुलीला कब्रस्थानात नेले. तेथे नेऊन मुलीच्या हाताचे चुंबन घेतले.

विजय गायकवाड

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 27, 2022 | 10:25 PM

वसई : वसईत मदरसामध्ये केअर टेकर असलेल्या एका तरुणाने 10 वर्षीय मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी या आरोपीला बेदम चोप (Beating) देत रस्त्यावरून त्याची धिंड काढली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नूरहुल्ला अश्रफ अली शेख (24) असे विनयभंग करणाऱ्या वासनांध आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वसईच्या वालिव पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत. (10-year-old girl molested by Maulana in Vasai, accused beaten up by locals)

स्थानिकांकडून आरोपीची पोलिस ठाण्यापर्यंत धिंड

पीडित 10 वर्षाची मुलगी आज सकाळी 10 च्या सुमारास दुकानात सुट्टे पैसे आणण्यासाठी गेली होती. यावेळी तेथे दुकानाच्या बाजूला उभ्या असलेल्या आरोपीने मुलीला बोलावले आणि सुट्टे पैसे देतो असे सांगून पीडित मुलीला कब्रस्थानात नेले. तेथे नेऊन मुलीच्या हाताचे चुंबन घेतले. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देत त्याची पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. यावेळी रस्त्यांवर बघ्यांची गर्दी जमली होती. बघ्यांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

डोंबिवलीत दारुड्याला बेदम चोपले

मद्यधुंद अवस्थेत लेडिज ब्युटी पार्लरमध्ये घुसलेल्या दारुड्याला महिलेने चांगलाच चोप दिल्याची घटना डोंहिवलीत घडली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा बेवडा एका लेडीज ब्युटी पार्लरमध्ये घुसला होता. यावेळी पार्लरमधील महिलेने त्याला बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र बेवडा बाहेर जाण्यास तयार नव्हता. अखेर संतापलेल्या महिलेने त्याला बाहेर खेचत आणले आणि बेदम चोप दिला. महिलेचा चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (10-year-old girl molested by Maulana in Vasai, accused beaten up by locals)

इतर बातम्या

Chandrapur Crime | दोन गांजा तस्करांना अटक, 33 लाखांचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Pune Crime | पुण्यात तरुणांची भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिसांवर ‘कोयत्याने’ वार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें