AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar Accident : पालघर-मनोर रस्त्यावर भीषण अपघात, भरधाव टेम्पोनं चिरडल्यानं 15 मेंढ्या जागीच ठार

पालघर-मनोर रस्त्यावर वाघोबा खिंडीत भीषण अपघात (Accident) झालाय. रस्त्याच्या कडेला जात असताना भरधाव टेम्पोनं मेंढ्यां(Sheep)ना चिरडलंय. या दुर्घटनेत 15 मेंढ्या जागीच ठार झाल्यात.

Palghar Accident : पालघर-मनोर रस्त्यावर भीषण अपघात, भरधाव टेम्पोनं चिरडल्यानं 15 मेंढ्या जागीच ठार
पलघर अपघात
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 23, 2021 | 10:10 PM
Share

मोहम्मद हुसेन खान, टीव्ही9 मराठी, पालघर : पालघर-मनोर रस्त्यावर वाघोबा खिंडीत भीषण अपघात (Accident) झालाय. रस्त्याच्या कडेला जात असताना भरधाव टेम्पोनं मेंढ्यां(Sheep)ना चिरडलंय. या दुर्घटनेत 15 मेंढ्या जागीच ठार झाल्यात. तर 11 मेंढे गंभीर जखमी आहेत. दरम्यान, मनोरवरून पालघरकडे येणाऱ्या एका ट्रकच्या खाली 15 मेंढ्या चिरडल्यानंतर ट्रक जागेवर सोडून ट्रकचा चालक पळून गेला असून पालघर पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

आधी एक मेंढी आली ट्रकखाली

अहमदनगर येथील एक मेंढपाळ आपल्या शेकडो मेंढ्या-बकऱ्या घेऊन एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करीत असतात. गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हे मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन मनोरवरून पालघरकडे निघाले असताना वाघोबा खिंडीत आले असता रस्त्यावरून चालणाऱ्या मेंढ्याच्या कळपातली एक मेंढी ट्रकखाली आली.

थांबण्याऐवजी ट्रकचालक पळाला

यावेळी मेंढपाळांनी आरडाओरड केल्यावर घाबरून ट्रकचालक थांबण्याऐवजी ट्रक घेऊन पळून जायला लागला. त्यावेळी बिथरलेल्या मेंढ्या रस्त्यावर आल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात 15 मेंढ्या ट्रकखाली चिरडून ठार झाल्या तर अन्य 5 मेंढ्या जखमी झाल्याची घटना घडली.

ट्रक चालकावर  गुन्हा

हा अपघात भीषण होता. मोठ्या प्रमाणात मेंढ्या मृत झाल्यानं घाबरून चालकानं घटनास्थळावरून पळ काढला असून  ट्रक चालकावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omicron : चिंता वाढली; राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद, दिवसभरात 23 नवे रुग्ण आढळले!

Smartwatch : स्मार्टवॉच घेताय? बोटनं लॉन्च केलं नवं प्रॉडक्ट, किंमत पाच हजार रुपयांपेक्षाही कमी!

Intrest Rate : निवृत्तीत ‘आधार’ काठी; 8 वर्षात रक्कम दामदुप्पट, पीपीएफपेक्षा अधिक व्याज, जाणून घ्या पर्याय

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार