शेताच्या मशागतीसाठी घराबाहेर पडला, दुपारी अचानक विजांचा कडकडाट, घरी परतताना काळाचा घाला

अकोल्याच्या आपोती येथील गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वीज कोसळल्याने 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

शेताच्या मशागतीसाठी घराबाहेर पडला, दुपारी अचानक विजांचा कडकडाट, घरी परतताना काळाचा घाला
शेताच्या मशागतीसाठी घराबाहेर पडला, दुपारी अचानक विजांचा कडकडाट, घरी परतताना काळाचा घाला
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 8:30 PM

अकोला : अकोल्याच्या आपोती येथील गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 16 वर्षीय तरुण शेतातून घरी येत असताना विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु होता. हा तरुण गावात पोहोचण्यासाठी अवघे काही क्षण शिल्लक असताना नियतीने डाव साधला. या तरुणावर वीज कोसळली. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. मृतक मुलाचं नाव आदित्य किसनराव आपोतीकर असं आहे. आदित्यच्या निधनाच्या बातमीने गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळी निरभ्र वातावरण, दुपारी पाऊस

संबंधित घटना ही दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. खरंतर अकोल्यात आज सकाळी निरभ्र वातावरण होतं. पण दुपारच्या सुमारास एकाएकी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे सकाळी शेतात गेलेले शेतकरी, शेतमजूर यांनी घरचा रस्ता धरला. यामध्ये आदित्यचा देखील समावेश होता. तो शेतीचं काम करायचा.

वीज कोसळून आदित्यचा मृत्यू

आदित्य अवघ्या काही क्षणामध्ये गावात दाखल झाला असता. पण नियतीच्या मनात भलतंच काहीतरी होतं. आदित्य गावापासून अवघ्या काही पावलांवर असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत आदित्यचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटनाही ही दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

आदित्य हा मनमिळाऊ, शांत स्वभावाचा होता. त्याचं गावातील सगळ्यांशी चांगले भावनिक संबंध होते. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर गावातील अनेकांनी टाहो फोडला. आदित्यच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. दरम्यान, आदित्यच्या मृत्यूनंतर बोरगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील रुग्णालयात पाठवण्यात आला.

हेही वाचा : 

भावालाही मुलगी झाली, आपल्या लेकीचे लाड कोण करणार? यवतमाळमध्ये नणंदेने वहिनीला जाळले

जगावेगळी चोरी! तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे मासे, चौघांविरोधात तक्रार, पोलीसही चक्रावले

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.