Parabhani Raid : परभणीत हायफ्रोफाईल जुगार अड्यावर धाड, 26 लाखाच्या मुद्देमालासह 45 जुगारी अटकेत

| Updated on: May 11, 2022 | 1:35 AM

सेलूच्या कृष्ण नगर येथे श्री साई सेवाभावी संस्था येथे बंद खोलीत विनापरवाना बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आपल्या पथकासह 9 मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

Parabhani Raid : परभणीत हायफ्रोफाईल जुगार अड्यावर धाड, 26 लाखाच्या मुद्देमालासह 45 जुगारी अटकेत
परभणीत हायफ्रोफाईल जुगार अड्यावर धाड
Image Credit source: tv9
Follow us on

परभणी : परभणी सेलू शहरात एका हायप्रोफाईल जुगार (Gambling) अड्यावर धाड (Raid) टाकून पोलिसांनी 26 लाखांच्या मुद्देमालासह 45 जुगाऱ्यांना अटक (Arrest) केले आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अशा कारवाया जिल्हाभरात व्हावेत अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे. सेलू शहरात आजपर्यंतची ही सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

सेलूच्या कृष्ण नगर येथे श्री साई सेवाभावी संस्था येथे बंद खोलीत विनापरवाना बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आपल्या पथकासह 9 मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीत नगदी रुपये, जुगाराचे साहित्य, मोटारसायकल, मोबाईल, फोर व्हीलर कार, टेबल खुर्च्या, डीव्हीआर प्लास्टिक कॉइंन असा 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इचलकरंजी शहरात तीन पत्ती पत्त्याच्या क्लबवर छापा

इचलकरंजी शहरातील विक्रमनगर परिसरामध्ये भारती आवळे यांच्या मालकीच्या विश्व विजय मंडळ या नावाखाली तीन पत्ती पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 40 जणांवर गुन्हा दाखल करून सुमारे रोख रक्कम गाडी 6 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती आवळे व सलीम बागवान यांच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे सुद्धा वाचा