बाळू धानोरकर यांच्या जागी कोण लढणार? काँग्रेसमधून 7 नेत्यांची नावे चर्चेत; उमेदवाराच्या शोधासाठी ऑनलाईन सर्व्हे

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी काँग्रेसमधून एकूण सातजण इच्छूक आहेत. तर काँग्रेसच्या एका गटाने उमेदवाराचा शोध घेण्यासाठी ऑनलाईन सर्व्हे सुरू केला आहे.

बाळू धानोरकर यांच्या जागी कोण लढणार? काँग्रेसमधून 7 नेत्यांची नावे चर्चेत; उमेदवाराच्या शोधासाठी ऑनलाईन सर्व्हे
balu dhanorkarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 7:41 AM

चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचाही उमेदवार उतरण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसने ऑनलाई सर्व्हेही घेतला आहे. मात्र, सध्या काँग्रेसमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सात नेते इच्छूक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी ॲानलाईन सर्वेतून काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध घेण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेसकडून हा सर्व्हे करण्यात येत आहे. तर चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, विनायक बांगडे, आमदार प्रतिभा धानोरकर, मनोहर पाऊणकर, प्रकाश देवतळे आणि अनिल धानोरकर या सात नेत्यांची नावे चंद्रपूर लोकसभेसाठी चर्चेत आहेत.

हे सुद्धा वाचा

खासदार संख्या शून्यावर

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तुल्यबळ उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. धानोरकर हे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्यांच्या निधनाने राज्यातील काँग्रेस खासदारांची संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपली पत राखण्यासाठी काँग्रेसला ही जागा निवडून आणणे प्रतिष्ठेचे बनले आहे. त्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. म्हणूनच काँग्रेसने ऑनलाईन सर्व्हे करून उमेदवाराचा शोध सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

कोण करतंय ऑनलाईन सर्व्हे?

चंद्रपूर लोकसभा पोटणीवडणूकीत काँग्रेसचा उमेदवार शोधण्यासाठी ॲानलाईन सर्वे नेमकं कोण करतंय? असा सवाल केला जात आहे. तसेच या सर्व्हेमुळे चर्चेला उधाणही आलं आहे. उमेदवार शोधण्यासाठी ॲानलाईन सर्वे काँग्रेसने सुरु केला की इतर कुणी? बाळू धानोरकर यांच्या निघनाला आठवडा लोटला नाही तर उमेदवार शोधण्याची घाई कुणाला? चंद्रपूर लोसकभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार शोधण्यासाठी ॲानलाईन सर्वे नेमका कोणत्या गटाने सुरु केला? असे सवाल करण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन सर्व्हेत पसंतीच्या उमेदवारापुढे टीक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.