AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीकाठच्या वढोली गावात आढळले मगरीचे पिल्लू, युवकांनी दिले जीवदान…

दिवाण गोचे यांच्या शेतात मगरीचे पिल्लू आढळल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावातील सूरज दीवाण गोचे, सूरज केळझरकर ,समीर विरुटकर यांनी पावडयाच्या सहाय्याने पिलाला स्टीलच्या डब्यात सुरक्षित पकडून शेताच्या लगत वाहणाऱ्या इरई नदित सोडून देत जीवदानच दिले आहे.

Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीकाठच्या वढोली गावात आढळले मगरीचे पिल्लू, युवकांनी दिले जीवदान...
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 10:03 AM
Share

चंद्रपूर : मागील 15 दिवसांपासून चंद्रपूर जिल्हयात (Chandrapur District) सर्वत्र मूसळधार पाऊस सुरुयं. नदी, नाले दुथडी भरून वाहु लागले आहेत. नदीकाठ परिसरात पूर (Flood) परिस्थिति निर्माण झालीयं. यामुळे अनेक प्राण्यांना आपल्या अधिवासापासून दूर व्हावे लागले. अशातच आज वढोली गावातील दिवाण गोचे यांच्या शेतात रोवणीचे काम सुरु असताना त्यांना एक मगरीचे (Crocodile) छोटे पिल्लू आढळून आले. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नद्यांना पूर आल्याने मगरी वाहून येत आहेत. यापूर्वी परिसरात असा घटना घडल्याचे कळते आहे.

दिवाण गोचे यांच्या शेतात आढळले मगरीचे पिल्लू

दिवाण गोचे यांच्या शेतात मगरीचे पिल्लू आढळल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावातील सूरज दीवाण गोचे, सूरज केळझरकर ,समीर विरुटकर यांनी पावडयाच्या सहाय्याने पिलाला स्टीलच्या डब्यात सुरक्षित पकडून शेताच्या लगत वाहणाऱ्या इरई नदित सोडून देत जीवदानच दिले आहे. इरई नदीला पूर आल्याने अनेकदा परिसरात मगरी आढळून येतात. नदीच्या पाण्याचा जोर वाढल्याने आश्रयासाठी प्राणी शेतात येतात.

चंद्रपूर जिल्हात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच

चंद्रपूर जिल्हात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांनी पात्र सोडले आहे. इरई नदीत पाणीपातळी वाढून लागली आहे. सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मागील 15 दिवसांपासून चंद्रपूर जिल्हयात सतत पाऊस सुरूयं. अनेक नद्यांना पूर देखील आलायं. नदीकाठ परिसरात पुरस्थिति आहे.

Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात