AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar Crime : तब्बल 11 वर्षांनी खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटक, अहमदनगर गुन्हे शाखेची कारवाई

आरोपीने 11 वर्षापूर्वी बुलढाण्यात क्षुल्लक कारणातून सहकारी ट्रकचालकाचा खून केला होता. आरोपीने खून करून सिंधखेडराजाजवळ मृतदेह जाळून टाकला होता. तसेच त्याच्या ताब्यातील ट्रक चोरून नगरला आणला. त्यातील सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मालही आरोपीने पस्पर विकला आणि नंतर फरार झाला होता.

Ahmednagar Crime : तब्बल 11 वर्षांनी खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटक, अहमदनगर गुन्हे शाखेची कारवाई
तब्बल 11 वर्षांनी खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटक, अहमदनगर गुन्हे शाखेची कारवाई
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 11:30 PM
Share

अहमदनगर : कानून के हाथ बडे लंबे होते है या चित्रपटातील डायलॉगची प्रचीती अहमदनगरमध्ये आली आहे. कारण तब्बल 11 वर्षांपासून खुना (Murder) तील फरार असलेल्या एका आरोपीला पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखे (Local Crime Branch)च्या पोलिसांना यश आलं आहे. भरत मारुती सानप असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. क्षुल्लक कारणातून सहकारी ट्रकचालकाचा खून करून आरोपी फरार झाला होता. पोलिसांना सापडू नये म्हणून हा आरोपी सतत नाव बदलत होता. तर त्याने आधार कार्ड देखील बनवले होते. मात्र त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना त्याचे जुने निवडणूक ओळखपत्र सापडले. त्यावर त्याचे खरे नाव होते. त्याआधारे त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला अटक केली. (Accused arrested for murder after 11 years, Ahmednagar Crime Branch action)

क्षुल्लक कारणातून सहकारी ट्रकचालकाचा केला होता खून

आरोपी भरत मारुती सानप हा आपली ओळख लपवून अभिमान मारूती सानप या नावाने परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे राहत होता. आरोपीने 11 वर्षापूर्वी बुलढाण्यात क्षुल्लक कारणातून सहकारी ट्रकचालकाचा खून केला होता. आरोपीने खून करून सिंधखेडराजाजवळ मृतदेह जाळून टाकला होता. तसेच त्याच्या ताब्यातील ट्रक चोरून नगरला आणला. त्यातील सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मालही आरोपीने पस्पर विकला आणि नंतर फरार झाला होता. तेव्हापासून सिंधखेडराजा आणि नगरचे पोलीसही आरोपीचा शोध घेत होते. अखेर 11 वर्षांनी त्याला पकडण्यात यश आलं आहे.

मित्राचा खून केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप

अहमदनगरमध्ये मित्राचा खून केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरत, जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अमित बाबूराव खामकर असे आरोपीचे नाव आहे. त्याने राहुल भागवत निमसे याचा खून केला होता. आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने मयताचा खून केल्यानंतर त्याचे प्रेत बेडशीटमध्ये बांधून मोकळ्या पटांगणात टाकले होते. तसेच मयताच्या खिशातील एटीएम कार्ड काढून घेतले होते. त्यानंतर केडगाव येथील शहर सहकारी बँकेतून 40 हजार रुपये काढले. मोटारसायकल अपघातात झालेल्या जखमांमुळे राहुल मयत झाल्याचे आरोपीने सांगितले होते. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर हत्येचा उलगडा झाला. (Accused arrested for murder after 11 years, Ahmednagar Crime Branch action)

इतर बातम्या

Video | बसची कारला धडक, कालचालक महिलेनं बसचालकाच्या थोबाडीत लगावली कडक! चूक कुणाची?

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत, पोलिसांनी परत केला 23 लाख 18 हजारांचा मुद्देमाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.