Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत, पोलिसांनी परत केला 23 लाख 18 हजारांचा मुद्देमाल

या मुद्देमालात तब्बल पाव किलो वजनाची सोन्याची लगड, 59 मोबाईल आणि 16 गाड्यांचा समावेश आहे. या एकूण मुद्देमालाची किंमत 23 लाख 18 हजार रुपये असून त्यात उल्हासनगर पोलीस ठाण्याने पकडलेल्या 10 लाख 3 हजार, मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील 9 लाख 35 हजार, तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील 3 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत, पोलिसांनी परत केला 23 लाख 18 हजारांचा मुद्देमाल
उल्हासनगरात चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 10:07 PM

उल्हासनगर : एखादी गोष्ट चोरीला गेली, की सहसा ती परत मिळण्याची अपेक्षा आपण सोडून देतो. मात्र उल्हासनगरात पोलिसां (Ulhasnagar Police)नी असा चोरीला गेलेला तब्बल 23 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल शोधून तो त्यांच्या मूळ मालकां (Main Owner)ना परत केलाय. उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या वर्ष दोन वर्षात झालेल्या चोरीच्या अनेक प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला. यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलिसांनी समारंभपूर्वक मूळ मालकांना परत केला. या मुद्देमालात तब्बल पाव किलो वजनाची सोन्याची लगड, 59 मोबाईल आणि 16 गाड्यांचा समावेश आहे. या एकूण मुद्देमालाची किंमत 23 लाख 18 हजार रुपये असून त्यात उल्हासनगर पोलीस ठाण्याने पकडलेल्या 10 लाख 3 हजार, मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील 9 लाख 35 हजार, तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील 3 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. उल्हासनगरच्या टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या हस्ते हा सगळा मुद्देमाल परत करण्यात आला. (In Ulhasnagar, the stolen goods were returned to the original owners, the police returned 23 lakh 18 thousand rupees)

दरम्यान, ज्या नागरिकांना हा मुद्देमाल परत मिळाला, त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. हा मुद्देमाल आपल्याला परत मिळेल, अशी अपेक्षा सोडून दिलेली असताना पोलिसांनी आमच्या वस्तू शोधून परत केल्यानं सुखद धक्का बसल्याचं हे मूळ मालक म्हणाले. उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात वाहनचोरी, मोबाईल चोरी या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून आरोपींना जरब बसवली जावी, अशी अपेक्षा यानंतर व्यक्त होतेय.

वाहन विकणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांकडून पर्दाफाश

भाड्याने घेतलेली वाहने परस्पर विकणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून 24 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत 2 कोटी 64 लाख रुपये आहे. उमेश चव्हाण आणि अद्बुल कादिर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी ज्या गाड्यांचा हफ्ता थकला आहे त्या गाड्यांच्या मालकांशी संपर्क साधून हफ्ता आपण भरतो सांगून भाड्याने चालवण्यास घ्यायचे आणि परस्पर विकायचे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही आरोपींचा गोरख धंदा सुरु होता. या टोळीत आणखी आरोपींचा सहभाग आहे का त्याची पोलीस चौकशी करत आहेत. (In Ulhasnagar, the stolen goods were returned to the original owners, the police returned 23 lakh 18 thousand rupees)

इतर बातम्या

VIDEO : परभणीत सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीकडून रोड रोमिओला चोप, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

Thane Crime : क्लासला जाते म्हणून निघाली अन् थेट बंगालला गेली, मोबाईल गेमच्या नादात अल्पवयीन मुलीनं सोडलं घर

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.