अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे या महापौर पदाच्या उमेदवार आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत. येत्या 30 जूनला अहमदनगर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे

अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
अहमदनगर महापालिका
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 10:58 AM

अहमदनगर : अहमदनगर महापौर पदासाठी शिवसेना सोमवारी (28 जून) अर्ज दाखल करणार आहे. शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सेनेकडे महापौरपद, तर राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. येत्या 30 तारखेला महापौरपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेसची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Ahmednagar Mayor Election Shivsena NCP Formula Decided)

शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीगाठी

अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपचा महापौर आहे. अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले होते. गेल्या महिन्यात अहमदनगरमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे.

अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2

2018 मध्ये अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत काय घडलं होतं?

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत 2018 मध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले होते. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली होती. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं होतं. कारण भाजपवासी सासरे शिवाजी कर्डिलेंना राष्ट्रवादीवासी जावई संग्राम जगताप यांनी मदत केली होती.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

सांगली, जळगावप्रमाणे भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार?

(Ahmednagar Mayor Election Shivsena NCP Formula Decided)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.