5

सांगली, जळगावप्रमाणे भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार?

अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा महापौर आहे. मात्र, आता शिवसेनेचा उमेदवार देण्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

सांगली, जळगावप्रमाणे भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार?
अहमदनगरच्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवार, एकनाथ शिंदेंची भेट
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 9:13 PM

अहमदनगर : सांगली आणि जळगाव महापालिकेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर आता अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं स्पष्ट झालंय. कारण, अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा महापौर आहे. मात्र, आता शिवसेनेचा उमेदवार देण्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. (Consensus on making ShivSena mayor in Ahmednagar municipal corporation)

अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. अहमदनगर महापालिकेतील महापौर पदाची मुदत 30 जून रोजी संपत आहे. त्यामुळे महापौर पदाची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीचं जुळणार का?

अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष आहे. यंदा महापौर पदासाठी राज्यातील महाविकास आघाडी प्रमाणे नगरमध्ये सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार की नवीन समीकरणे पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली होती. तसंच महाविकास आघडीचं जुळणार का? असा सवालही उपस्थित केला जात होता.

काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या  शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यात संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, माजी महापौर भगवान फुलसौदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजीराजे कदम, मा सभागृह नेते अनिल शिंदे, शिवसेना गट नेते संजय शेंडगे हे उपस्थित होते.

महापौर पदासाठी उमेदवार

रोहिणी शेंडगे- शिवसेना

रिता भाकरे- शिवसेना

शीला चव्हाण- काँगेस

रोहिणी पागीरे- राष्ट्रवादी

तर भाजपकडे उमेदवार नाही

अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

Consensus on making ShivSena mayor in Ahmednagar municipal corporation

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?