अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

अनिश बेंद्रे

Updated on: Sep 24, 2020 | 4:14 PM

स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता असतानाच भाजपचे दावेदार मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

अहमदनगर : अहमदनगर महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीपूर्वी भाजपला धक्का बसला आहे. सभापती पदासाठी रिंगणात असणारे भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Ahmedanagr BJP corporator Manoj Kotkar enters NCP)

स्थायी समिती सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली असतानाच भाजपचे दावेदार मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

मनोज कोतकर यांच्या प्रवेशाने राजकीय भूकंप आल्याची चर्चा नगरच्या राजकारणात रंगली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोतकरांनी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. कोतकरांच्या पक्षांतरामागे जगताप यांचा सहभाग असणे साहजिक मानले जाते.

भाजपसोबत शिवसेनेलाही धक्का

दरम्यान, स्थायी समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेकडून नगरसेवक योगीराज गाडे रिंगणात आहेत. त्यामुळे भाजप नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश करणे हा भाजपसोबतच शिवसेनेलाही धक्का मानला जात आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार का? भाजप आता कोणती खेळी करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Ahmedanagr BJP corporator Manoj Kotkar enters NCP)

पारनेरचा नाराजीनामा

दरम्यान, अहमदनगरच्या स्थानिक राजकारणातील खेळी नवीन नाही. पारनेरमधील पाच नगरसेवकांनी जुलै महिन्यात शिवसेना-राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली होती. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा ‘शिवबंधन’ हाती बांधले.

संबंधित बातम्या 

शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?

पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, म्हणजे अजित पवारांनी फोडले असा अर्थ नाही : संजय राऊत

(Ahmedanagr BJP corporator Manoj Kotkar enters NCP)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI