AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कालीचरणची जागा जेलमध्येच”; एमआयएमच्या खासदाराने कालीचरण महाराजांचे वाभाडे काढले

मविआला वाटलं पाहिजे की, एमआयएममध्ये ताकद आहे तरच आम्हाला सोबत घ्या असंही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देश्यून बोलले आहेत.

कालीचरणची जागा जेलमध्येच; एमआयएमच्या खासदाराने कालीचरण महाराजांचे वाभाडे काढले
| Edited By: | Updated on: May 14, 2023 | 4:33 PM
Share

अहमदनगर : नुकताच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे, त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे आता खळबळ माजली आहे. एकीकडे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत हिंदू-मुस्लिम या मुद्यावरून निवडणूक लढविण्यात आली तर आता दुसरीकडे एमआयएमने कालीचरण महाराज यांच्यावर वक्तव्य करुन नवा वाद उखरुन काढला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील राजकारणापासून ते महाविकास आघाडीसोबत आघाडी करायची की नाही यावरही त्यांनी चर्चा केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी कालीचरण महाराजावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे भगवे कपडे घालून कुणी स्वामी आणि गुरु होत नाही, आणि भगवे कपडे घातले म्हणजे त्यांना आता गुरु म्हणायला सुरुवात केली जाते असा टोलाही त्यांनी महाराज लोकांना लगावला आहे.

इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका करताना सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, भगवा कपडा घालून कोणीही महाराज होत नाही. मात्र भगवे कपडे घालून अनेक जण आता महाराज आणि स्वामी होण्याच्या मार्गावर आहेत.

अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी भगवे कपडे घालून स्वामी गुरु म्हणायला सुरुवात केली असा टोलाही त्यांनी त्यांना लगवला आहे.

हे महाराज लोकं काहीही बोलत असतात. हे तोंड उघडले की विष ओकणार असा टोलाही त्यांनी कालीचरण महाराजांना लगावला आहे.

त्यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की,हे महाराज किती दिवस बाहेर आहेत माहीत नाही मात्र त्यांची जागा जेलमध्ये आहे असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

तर त्यांनी पोलिसांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकीय दबावामुळे पोलीस काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतात, मात्र असे 10 कालीचरण जरी आले तरी आमच्या तोंडाला लागू शकत नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. पोलिसांनी मला परवानगी द्यावी मी कालीचरणपेक्षाही चांगले भाषेत त्यांना समजून सांगू शकतो असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

तर इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीविषयी बोलताना सांगितले की, आम्ही महाविकास आघाडीसोबत यायला तयार आहे. मात्र मविआला वाटलं पाहिजे की, एमआयएममध्ये ताकद आहे तरच आम्हाला सोबत घ्या असंही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देश्यून बोलले आहेत.

मविआसोबत जाताना मात्र दुटप्पी भूमिका असून चालणार नाही. कारण दुटप्पी भूमिका घेणं कुठेतरी थांबवायला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.