AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट, अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला महिनाभरात दुसरा धक्का

अवकाळी पावसात एका तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. बाळापूर तालुक्यातील सातरगाव शेत शिवारातून घरी परत येत असताना 30 वर्षीय रविंद्रसिंग चव्हाण याच्या अंगावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मुत्यू झाला आहे.

अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट, अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला महिनाभरात दुसरा धक्का
Ravindra Singh Chavan
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 1:38 PM
Share

अकोला: अकोला जिल्हातील बाळापूर तालुक्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसात एका तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. बाळापूर तालुक्यातील सातरगाव शेत शिवारातून घरी परत येत असताना 30 वर्षीय रविंद्रसिंग चव्हाण याच्या अंगावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मुत्यू झाला आहे.

महिन्यात कुटुंबाला दोन धक्के

बाळापूर येथील औरगपुरा भागात राहणारे चतुरसिंग चव्हाण यांना दोन मुले रविंद्रसिंग आणि मुकेशसिंग यांच्यासह एक विवाहीत मुलगी आहे. सातरगांव येथे त्यांची 2 एक्कर बागायती शेती आहे. शेतातील काम संपवून घरी येत असताना मंगळवारी 2 ते 3 च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली ,त्यामुळे रविंद्सिंग ने झाडाखाली सहारा घेतला असता झाडावर वीज झाडावर वीज पडली. यात झाडाखाली उभा असलेला रविंद्सिंग याच्याही अंगावर वीज पडल्याने रवींद्रचा जागीच मृत्यू झाला.

एक महिन्यापूर्वी पुण्यात कार अपघातात रवींद्रसिंग च्या लहाण्या भावाचा मृत्यू झाला होता,आणि आज रवींद्रचा मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे या बाबत शहरात हळहळ होत आहे.

अकोल्यात मंगळवारी गारपीट

अकोल्यात मंगळवारी अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पाऊस व गारपीटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील डाबकी रोडवरील नालीचे पाणी रोडवर आल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.तर या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांची तारांमबळ उडाली असून,बाहेर ठेवलेलं धांन्य वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. तर, जोरदार वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानामधील झाड बाहेर रोडवर उभ्या असलेल्या टमटम वर पडल्याने टमटम मातीत अडकलं होतं. अचानक पावसामुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडला असून, हरभरा,तूर आणि गहू पिकाचे नुकसान होण्याची श्यक्यता आहे.

इतर बातम्या:

Rajesh Tope on School : अहमदनगरच्या शाळेत कोरोनाचा भडका, मुख्यमंत्री टास्क फोर्स शाळांबाबत निर्णय घेणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न

इतर बातम्या:

Akola Farmer Ravindrasingh Chavan died due lightening strike in unseasonal rain

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.