AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: कंगनाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही ‘पद्मश्री’ व्हायचंय दिसतंय; बाळासाहेब थोरातांचा जोरदार टोला

देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो. संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळालं. तिचं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून अभिनेते विक्रम गोखलेंनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय.

VIDEO: कंगनाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही 'पद्मश्री' व्हायचंय दिसतंय; बाळासाहेब थोरातांचा जोरदार टोला
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 12:55 PM
Share

नगर: देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो. संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळालं. तिचं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून अभिनेते विक्रम गोखलेंनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय, असा चिमटा काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढला.

नगर येथील एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना रणावत, अभिनेते विक्रम गोखले आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. कंगना म्हणते स्वातंत्र्य ही भीक आहे. 2014 साली खरं स्वातंत्र्य मिळालं. कसलं स्वातंत्र्य मिळालं? हे बोलणं वेडेपणाचं आहे. त्यावर बोलण्यात अर्थ नाही. कुणी तरी बोलायचं मग लगेच त्यांना संरक्षण मिळतं. 40 बॉडिगार्ड उभे राहतात. जो वादग्रस्त बोलला त्याला त्रास होऊ नये म्हणून संरक्षण दिलं जातं. पुढे लगेच पद्मश्री मिळते. असं पाहिल्यानंतर विक्रम गोखले नावाचे गृहस्थ बोलायला लागले. त्यांनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय. याचा अर्थ कसं बोला कसं वागा ते चालतं, अशी टीका थोरात यांनी केली.

जगात गांधींच्या नावानेच चळवळी होतात

स्वातंत्र्यासाठी काहींचा त्याग झाला घरावर नांगर फिरला. स्वातंत्र्य सहज मिळालं नाही. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या विचारामुळेच स्वातंत्र्य मिळाले. अनेकजण शहीद होत होते. एकजुटीने पुढे येऊन अंगावर गोळ्या झेलत होते. इतकी प्रेरणा त्यांना गांधी विचारातून मिळाली होती. आजही जगात जिथे जिथे चळवळ चालते तिथे तिथे महात्मा गांधींचं नाव घेऊन चळवळ चालते, असं सांगतानाच ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार कुणाला नाहीये. ते राष्ट्रपिताच आहेत. त्यांना विचाराने संपू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच त्यांच्यावर टीका केली जातेय, असं ते म्हणाले.

यामागे कोणता मेंदू?

आज स्वातंत्र्यावर बोलले. स्वातंत्र्य चळवळीवर बोलले. स्वातंत्र्य बोगस असल्याचं विधान केलं. उद्या ते राज्यघटनेवरही बोलतील. आता म्हणतील राज्यघटना बोगस आहे. गरीबांना मतांचा अधिकार नको. कशाला हवा त्यांना मतांचा अधिकार. त्यांची दिशा पाहा, सर्व तुमच्या लक्षात येईल. हे बोलणं सहज नसतं. कोणी तरी मेंदू यामागे काम करत असतो, असा दावा त्यांनी केला.

राज्यघटनेनुसारच देश चालवावा लागेल

हळूहळू ते आपल्या राज्यघटनेवर येऊन पोहोचले तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही. जेव्हा ते राज्यघटनेवर येतील तेव्हा आपण जे कष्टाने मिळवलं ते सर्व गमावून बसू. नागरिकत्वाच्या तपासण्या अमूकतमूक हे विषय त्यांनी हातात घेतले होतेच. आता नव्या पद्धतीने ते समोर येत आहेत. धर्माचे नाव घेतल्यावर लोक मतदान करतात हे त्यांच्या पक्कं लक्षात आहे. मतं घ्यायचे आणि वाटेल तसं वागायचं हे चालू आहे. एकट्याचीच सत्ता आणायची. बाकी कोणी नको हे सुरू आहे. पण हा देश राज्यघटनेनुसारच चालवावा लागेल हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

VIDEO: एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

Rajastan Cabinet Reshuffle: आमच्या पक्षात दुफळी नाही, नेतृत्वाने योग्य पाऊलं घेतली, दलित चेहऱ्यांनाही जागा- सचिन पायलट

VIDEO: फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही; पंकजा मुंडेंची खदखद उघड

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....