AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये दरवर्षी जीर्ण पुलामुळे संपर्क तुटतो, अखेर गावकऱ्यांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात धाव

यवतमाळ जिल्ह्यातील बामर्डा गावाला जोडणारा पुल गेल्या 2 वर्षापासून जीर्ण होऊन खचलाय. दरवर्षी या गावाचा संपर्क तुटतो आणि त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

यवतमाळमध्ये दरवर्षी जीर्ण पुलामुळे संपर्क तुटतो, अखेर गावकऱ्यांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात धाव
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 6:54 AM
Share

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील बामर्डा गावाला जोडणारा पुल गेल्या 2 वर्षापासून जीर्ण होऊन खचलाय. दरवर्षी या गावाचा संपर्क तुटतो आणि त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाशी भेटून आपली समस्या मांडली परंतु त्यांच्याकडून कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. यंदाही तिच स्थिती उद्भवत असल्यानं आता या गावकऱ्यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेच दाद मागितली आहे (Bamarda village from Yavatmal complaint about damage bridge to National Human Rights Commission).

गावातील शेतकऱ्यांना या मार्गावरून जाण्या-येण्यासाठी अनेक अडचणी

बामर्डा गावाचा पावसामुळे याआधी पूर येऊन अनेकदा जनसंपर्क तुटला. जीर्ण झालेल्या या पुलाचे खोलीकरण कमी असल्याने पूर केव्हा येईल हे सांगताच येत नाही. सध्या शेतातील कामाची लगबग, पेरणीचा हंगाम सुरु झाल्याने गावातील शेतकऱ्यांना या मार्गावरून जाण्या येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना हातचे काम बुडवून पुलात अडकलेली पुराण काढण्यासाठी आपला वेळ द्यावा लागत आहे.

शाळा, दवाखाना व मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी याच पुलाचा वापर

शाळा, दवाखाना व मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना याच पुलाचा वापर करावा लागतो. पण अशी परिस्थिती दरवर्षी उद्भवत असल्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाशी भेटून आपली समस्या मांडली परंतु त्यांच्याकडून कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. म्हणून या समस्येबाबत थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात तक्रार करण्यात आली आहे.

बाम्बर्डा गावचे विधी अभ्यासक धनंजय आसुटकर म्हणाले, “आमचा लोकशाही प्रणालीवर विश्वास आहे. म्हणून आम्ही कायदेशीर मार्गाने आमचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण त्यातही विलंब करून आम्हाला आमच्या हक्कांपासून दूर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल.”

“खड्डेमुक्त रस्ते, चांगल्या परिस्थितीतील पूल हा मूलभूत अधिकारचाच भाग आहे. या अधिकाराची पूर्तता होत नसून इतरही संबंधित हक्कांची पायमल्ली होत आहे. त्यासाठी न्यायालयीन मार्ग वापरून आपले हक्क मिळवू शकतो. मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रश्नांवर आम्ही बामर्डा येथील गावकऱ्यांना मोफत कायदेशीररीत्या मदत करत आहोत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती पाथ फाउंडेशनचे अॅड. दीपक चटप आणि बोधी रामटेके यांनी दिली.

हेही वाचा :

Video | मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली, रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव, व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद जिल्ह्यात तुफान पाऊस, जुई नदीला पूर, पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प

पनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर

व्हिडीओ पाहा :

Bamarda village from Yavatmal complaint about damage bridge to National Human Rights Commission

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.