AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर

वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरत वाहतूक सुरळीत करण्याची कामगिरी केली आहे. (Traffic Police Fill Potholes at New Panvel bridge)

पनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर
| Updated on: Sep 24, 2020 | 7:49 AM
Share

पनवेल : नवीन पनवेलजवळील उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. हे लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरत वाहतूक सुरळीत करण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे या पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. (Traffic Police Fill Potholes at New Panvel bridge)

नवीन पनवेल उड्‌डाणपुलावरुन पनवेलला येणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे सर्वच वाहनचालकांना वाहनं चालवताना या त्रासचा सामना करावा लागत होता. तसेच खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडीही या ठिकाणी होत असे.

हीच बाब लक्षात घेऊन पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता जेसीबीव्दारे जवळील असलेल्या रेतीच्या सहाय्याने खड्डे भरले. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली आहे. वाहतूक पोलिसांनी ही कामगिरी केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पनवेल सर्व शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सह पोलीस उपनिरिक्षक वायंगणकर, हवालदार धनंजय घाडगे, महिला पोलीस शिपाई साधना पवार, ज्योती कहांडळ, पोलीस शिपाई निलेश भंगाळे इत्यादी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी हे काम केले.

वाहतूक पोलिसांचे काम वाहतूक कोंडी दूर करणं असतं. तर स्थानिक महापालिकेचे रस्त्यावरील खड्‌डे भरण्याचे काम असतानासुध्दा नागरिकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील खड्डे भरल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असला, तरी महापालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाहनचालकांना ही समस्या उद्भवत असताना प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.(Traffic Police Fill Potholes at New Panvel bridge)

संबंधित बातम्या :

नवरात्र, दसरा साधेपणाने साजरा करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाण्यात फिल्मी थरार, आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या बचावासाठी गेलेल्या पोलिसालाच पकडून ठेवले, थरारक सुटका

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.