AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडातात्या कराडकर ‘गनिमी काव्याने’ पंढपूरला जाणार, पोलीस यंत्रणा सतर्क

Pandhrpur | पंढरपुरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मानाच्या पालख्या आणि मोजक्या वारकऱ्यांशिवाय इतर कोणालाही पंढरपुरात प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे आता बंडातात्या कराडकर नेमके काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बंडातात्या कराडकर 'गनिमी काव्याने' पंढपूरला जाणार, पोलीस यंत्रणा सतर्क
बंडातात्या कराडकर
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 9:56 AM
Share

पंढरपूर: काही दिवसांपूर्वी पायी वारी काढण्यावर ठाम असलेले ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) मंगळवारी पंढरपुरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पोलिसांना चकवा देऊन बंडातात्या पंढरपुरात येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंढरपुरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मानाच्या पालख्या आणि मोजक्या वारकऱ्यांशिवाय इतर कोणालाही पंढरपुरात प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे आता बंडातात्या कराडकर नेमके काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यापूर्वी बंडातात्या कराडकर यांनी पोलिसांना चकवा देत आळंदी ते पंढरपूर पायी वारी काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पुण्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर बंडातात्या कराडकर आणि विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांच्या पंढरपुरात जाण्याच्या शक्यतेमुळे संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर साताऱ्याहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.

बंडातात्या कराडकर कोण आहेत?

हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

हभप बंडातात्यांनी 1996मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या 20 वर्षांपासून बंडातात्यांचं हे कार्य सुरू आहे. त्याशिवाय युवकांना इतिहास माहीत व्हावा म्हणून ते गडकोटांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. 1997पासून ही सुरुवात झाली, ती आजतागायत सुरू आहे.

व्यसनमुक्ती करतानाच त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे.

संबंधित बातम्या:

बंडातात्या कराडकर कोण आहेत? ज्यांना पोलीसांनी अटक केलीय?

बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, आमदार महेश लांडगे भेटीसाठी दाखल

प्रशासनानं वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, बंडातात्या कराडकर यांच्याकडून देहूच्या वेशीवरील आंदोलन स्थगित

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.