VIDEO | चप्पल न घालता मंदिरात, चोरी केल्यावर देवीची क्षमा, दानपेटी चोरांचा अनोखा स्वॅग

भंडाऱ्यातील पवनीच्या चंडिका माता मंदिरात चोरी झाली आहे. यावेळी चोरांनी दानपेटी फोडून पैसे चोरले. (Bhandara Chandika Mata temple thief passed by apologizing to goddess)

VIDEO | चप्पल न घालता मंदिरात, चोरी केल्यावर देवीची क्षमा, दानपेटी चोरांचा अनोखा स्वॅग
Bhandara Chandika Mata temple thief


भंडारा : भंडाऱ्यातील एका मंदिरात अजब चोरीची घटना घडली आहे. भंडाऱ्यातील पवनीच्या चंडिका माता मंदिरात चोरी झाली आहे. यावेळी चोरांनी दानपेटी फोडून पैसे चोरले. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर यातील एका चोराने देवीची क्षमा मागितली. तसेच मंदिरात चोरी करण्यापूर्वी या चोरांनी चप्पलही बाहेर काढली होती. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. (Bhandara Chandika Mata temple thief passed by apologizing to goddess)

नेमकी घटना काय?

भंडाऱ्यातील एक मंदिरातील चोरीची घटना घडली आहे. या व्हिडीओत एक चोर देवीच्या मंदिरात चोरी केल्यानंतर चक्क देवीला आपण केलेल्या कृत्याचा क्षमा मागत आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील सुप्रसिद्ध चंडिका माता मंदिरात मध्यरात्री 2 वाजता दोन चोरांनी प्रवेश केला.

या चोरांनी दानपेटी फोडत तेथील पैशांवर डल्ला मारला. मात्र लॉकडाऊन असल्याने या ठिकाणी जास्त पैसे नव्हते. त्यानंतर त्या चोरांनी होते तेवढे सर्व पैसे घेतले. पैसे घेऊन पहिला चोर निघाला. तर दुसरा चोर तिथे थांबला. त्याने केलेल्या चुकीची क्षमा मागितली.

आरोपीचा शोध सुरु

यानंतर देवीला हात जोडून नमस्कार करत निघून गेला. विशेष म्हणजे चोरानी मंदिरात प्रवेश करताना पायात चप्पल घातली नव्हती. चोरीची ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झाली. याप्रकरणी पवनी पोलिसांची तक्रार नोंद केली आहे. सध्या पोलिस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. (Bhandara Chandika Mata temple thief passed by apologizing to goddess)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

अतिवृष्टीचा इशारा, कर्जत-खालापूरमधील धबधबे, धरण आणि तलवापरिसरात जाण्यास बंदी!

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख; मुख्यमंत्र्यांनी केली रुग्णांची विचारपूस

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; काँग्रेसने रोखली सेनेची एक कोटींची कामे