औरंगाबादचा वाचनवेलू थेट जम्मूपर्यंत, ‘मोहल्ला बालवाचनालया’च्या 21 शाखा, जळगाव, पुण्यातही केंद्र

औरंगाबाद: कोरोनाच्या काळात (Lockdown) घरात राहून कंटाळलेल्या मुलांच्या हाती काही नवे विषय वाचायला दिले तर त्यांचा वेळ चांगला जाईल. तसेच वाचनसंस्कृतीही वाढीस लागेल, या हेतूने औरंगाबादेत 8 जानेवारी रोजी बायजीपुऱ्यात पहिल्या मोहल्ला बाल वाचनालयाची (Mohalla children Library) सुरुवात झाली. लहान मुलांना आवडतील अशा लहानशा आकारातील, रंगीबेरंगी कव्हरची, आकर्षक चित्रांची पुस्तके जमा केली गेली. मुलांनाही पुस्तके […]

औरंगाबादचा वाचनवेलू थेट जम्मूपर्यंत, 'मोहल्ला बालवाचनालया'च्या 21 शाखा, जळगाव, पुण्यातही केंद्र
कोरोना काळात औरंगाबादेत सुरु झालेल्या मोहल्ला बाल वाचनालयाला भरपूर प्रतिसाद
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 3:45 PM

औरंगाबाद: कोरोनाच्या काळात (Lockdown) घरात राहून कंटाळलेल्या मुलांच्या हाती काही नवे विषय वाचायला दिले तर त्यांचा वेळ चांगला जाईल. तसेच वाचनसंस्कृतीही वाढीस लागेल, या हेतूने औरंगाबादेत 8 जानेवारी रोजी बायजीपुऱ्यात पहिल्या मोहल्ला बाल वाचनालयाची (Mohalla children Library) सुरुवात झाली. लहान मुलांना आवडतील अशा लहानशा आकारातील, रंगीबेरंगी कव्हरची, आकर्षक चित्रांची पुस्तके जमा केली गेली. मुलांनाही पुस्तके आवडू लागली. एकानंतर एक अशी शहरात, जिल्ह्यात, जिल्हाबाहेरही बाल वाचनालयाची केंद्रे सुरु झाली अन् आठ महिन्यातच मोहल्ला बाल वाचनालयाचा विस्तार राज्यभर पोहोचला. औरंगाबदमध्ये (Aurangabad) शुक्रवारी मोहल्ला बालवाचनालयाच्या 21 व्या केंद्राचे उद्घाटन झाले.

कशी सूचली कल्पना?

मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांचे शहरात पुस्तकांचे दुकान आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून ते बंद होते. आता दुकानातील काही पुस्तकांचा उपयोग आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी करता येईल का, असा विचार मिर्झा यांच्या आठ वर्षाच्या मुलीने मांडला आणि त्यातूनच आकाराला आली मोहल्ला बाल वाचनालयाची संकल्पना. औरंगाबादेत याच वर्षात 8 जानेवारीला बायजीपुरा भागात पहिले मोहल्ला बालवाचनालय सुरू झाले. 31 ऑक्टोबरपर्यंत ही संख्या 25 पर्यंत नेण्यात येणार आहे. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरुवात झालेल्या या पहिल्या बालवाचनालयाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य फौजिया खान यांच्या हस्ते झाले. वाचन संस्कृती रुजवणारा हा वेलू मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह जळगाव, पुणे ते थेट जम्मूपर्यंत विस्तारत चालला आहे. यामध्ये 5 हजारांवर मुले जोडली गेली आहेत.

अट एकच पुस्तक वाचूनच परत करायचे

मराठी, ऊर्दू व हिंदी भाषेतील सुमारे 300 पुस्तके सर्व बालवाचनालयात दिसतात. एका छोट्याशा कपाटात बसणाऱ्या या पुस्तकांमध्ये किशोर या अवघ्या सात रुपयांच्या पुस्तकापासून ते हिंदी, मराठी साहित्य अकादमी, ऊर्दू अकादमीकडून प्रकाशित साहित्य आहेच, शिवाय भारतातील नामवंत व्यक्ती, क्रांतिकारकांची चरित्रे, साहित्यिकांच्या माहितीवर आधारित गोष्टी, कथा, कविता, कार्टून, चित्र रंगवण्यासारखी पुस्तके मुलांसमोर ठेवली जातात. विशेष म्हणजे पुस्तक आवर्जून घरी घेऊन जायचे आणि वाचून झाल्यानंतरच परत करायचे, अशी अट आहे. अवघ्या 10 हजारात आकारास येणाऱ्या या उपक्रमास ‘मायक्रो फंडिंग-मायक्रो लायब्ररी’ असे नाव दिलेले आहे, असे वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजवण्यासाठी पुढाकार घेतलेले मरीयमचे वडील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी सांगितले.

गांधी जयंतीला विशेष मोहीम राबवली

यंदाच्या गांधी जयंतीनिमित्त ऑटोरिक्षावाल्यांना 200 पुस्तके देण्यात आली. ज्यांना वाचता येत नाही त्यांनाही त्यांच्या घरातील मुलांसाठी उपयोगात आणा, असे म्हणून दिली. निवडणुकीत मतदान करा, पुस्तक घेऊन जा, असा उपक्रम आपण मागील वर्षांपासून राबवतो आहोत. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती येत्या 15 ऑक्टोबर रोजी असून त्याअनुषंगानेही एखादा उपक्रम राबवणार आहोत, असे मिर्झा यांनी सांगितले.

जम्मूत केंद्र उघडण्याचे काम सुरु

आज घरात सर्व वस्तू आणल्या जातात पण पुस्तक येत नाही. मुले मोबाइलला एवढी सराइत झाली आहेत की त्याना पुस्तक वाचणे माहितच नाही. हे विदारक आहे. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरासह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत व पुणे, जळगावमध्येही बालवाचनालये सुरू झाली आहेत. जम्मूतही काम सुरू आहे. यासाठी मुस्लिमेतर व्यक्तींकडूनही मदतीचा हात मिळतो आहे. सर्व धर्मियांतील मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. शासकीय अनुदान घ्यायचे नाही, असे आम्ही ठरवलेले आहे, असे वाचनालयाचे प्रमुख व रीड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी सांगितले.

इतर बातम्या-

भारीच! ग्रामपंचायतीनेच सुरु केलं स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय, औरंगाबादच्या कुंभेफळची देशात चर्चा

औरंगाबाद-पैठण रोडच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा, मंत्री भुमरे यांची गडकरींशी चर्चा, डिसेंबरमध्ये भूसंपादन

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.