AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिकडं नाही जमलं तर आमच्याकडं या… बावनकुळेंची काँग्रेसच्या या बड्या नेत्याला थेट ऑफर, ओबीसी समीकरण बदलणार?

Chandrashekhar Bawankule on Vijay Vadettiwar: आज कोल्हापुरात तेलीक समाज मेळावा झाला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे एकाच मंचावर आले. यावेळी वडेट्टीवारांनी बॅटिंग केल्यावर बावनकुळेंनी थेट पक्षात येण्याची ऑफरच दिली.

तिकडं नाही जमलं तर आमच्याकडं या... बावनकुळेंची काँग्रेसच्या या बड्या नेत्याला थेट ऑफर, ओबीसी समीकरण बदलणार?
चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 6:07 PM
Share

कोल्हापुरात आज तेलीक समाज मेळावा झाला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे एकाच मंचावर आले. यावेळी दोघांनी तुफान टोलेबाजी केली. विदर्भातील या दोन्ही नेत्यांचा कोल्हापूरात एकत्र जाहीर सत्कार करण्यात आला. वडेट्टीवारांनी बावनकुळे यांच्यावर फिरकी टाकल्यानंतर त्यांनी लागलीच काँग्रेसमध्ये जमलं नाही तर भाजपमध्ये येण्याची थेट ऑफर काँग्रेस नेत्याला दिली. या जुगलबंदीची राज्यात चर्चा सुरू असतानाच या ऐकीचा ओबीसी समाजाला फायद्या होईल का? असा सुद्धा सुरू उमटला.

तिकडं नाही जमलं तर …

“आमचा मंचावरील एक विनोदी विषय सुरू होता. 2029 मध्ये आमचं सरकार येऊ दे असं त्यांनी म्हटलं. मी त्यांना म्हटलं की त्यावेळी सुद्धा आमचंच सरकार राहणार आहे. तुम्ही गरज पडली तर आमच्याकडे या. हा खरा तर विनोदाचा भाग आहे. यामध्ये कुठलाही राजकीय भाव नाही. भावना नाही. वडेट्टीवार हे काँग्रेसमध्ये चांगले काम करत आहेत. ते हार्डकोअर नेते आहेत. ते त्या ठिकाणी चांगली भूमिका घेत आहेत. त्यामुळे हा विनोदाचा भाग आहे.” असं सांगायला बावनकुळे विसरले नाहीत.

असा धडाकेबाज महसूलमंत्री पाहिलाच नाही

तेलीक समाजाचा आवाज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर आहे. त्यांच्या सरकारच्या कानावर जाऊ दे. त्यांच्या सारखा धडाकेबाज निर्णय घेणारा महसूलमंत्री पाहीलाच नाही, असे कौतुक यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केले. एवढा मोठा मेळावा पश्चिम महाराष्ट्रात होईल असं वाटलं नव्हतं. ते सध्या सत्तेत आहेत. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यांनी जमेल तेवढं करा. आणि इकडून बोंबलण्यासाठी मला परवानगी द्या, असा टोला त्यांनी हाणला.

समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी बावनकुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडा मी अधिवेशनात प्रश्न मांडतो. आपल्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे. आपल्या समाजाचे महामंडळ निर्माण झालं पाहिजे हजारो कोटी रुपये मिळावेत. सध्या राज्यात तुम्ही दोन नंबरला आहात त्यामुळे तुमची जबाबदारी जास्त आहे. तुमची जबाबदारी आहे. तेवढी माझीही आहे. तुमची तिकडं चलती आहे. तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही. आपल्या धडाकेबाज निर्णयाने राज्यातील लाखो शेतकर्‍यांना फायदा झाला आहे. आपल्या माणसाला आपणचं मोठं केलं पाहिजे ही समाजाची भूमिका आहे. त्यामुळे विधानसभेत देखील तुमचा अभिनंदन केलेलं आहे. आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे. 29 ला आमचा नंबर लागला तर माझी तारीफ करायला सुद्धा आपण पाहिजे. तशी शक्यता मला वाटते, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी काढला.

विरोधी पक्षातही तुम्ही नंबर एकवर आहात आणि तिथेही तुम्ही नंबर एक वरच आहात. करवीर निवासिनी श्री अंबाबाईला वंदन करून जा की आपल्या माणसाचा नंबर वन नंबर लागला पाहिजे. 29 नंतर मात्र आमच्यासाठी काहीतरी काम ठेवा समाजाच्या उन्नतीसाठी 70 कोटी रुपये मी मंजूर केले आता तुम्ही सत्तर मध्ये शंभर कोटी रुपये घाला, म्हणजे समाजाचे प्रश्न सुटतील. संताजी महाराज यांचे प्रत्येक जिल्ह्यात समाज भवन निर्माण व्हावं. यासाठी मोठा निधी मंजूर व्हावा. मागणारे आम्ही देणारे तुम्ही आणि मागणारे आम्ही आहे. त्यामुळे हे काम होऊन जाईल. आठवड्यातून दोन तास समाजाच्या विकासासाठी वेळ द्या हा समाज तुम्हाला कधीही माझे टाकणार नाही. आपल्या समाजात सर्वात पहिला शिकलेला संत म्हणून जगणाडे महाराजांचा उल्लेख आहे. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. आता तेच बंद करायला निघालेत. आमच्या समाजाने कधीही भेसळयुक्त तेल विकलेलं नाही. आणि पाकीट मधलं तेल विकायला सुरुवात करा असं सांगतात, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार