AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत करुणा शर्मांबाबत घडलेला प्रकार कटकारस्थान, राम शिंदेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप

भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी परळीत करुणा शर्मा यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि अटकेवरून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय. परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत जे काही घडले त्यावरून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान रचल्याचे दिसून येत आहे, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केलाय.

परळीत करुणा शर्मांबाबत घडलेला प्रकार कटकारस्थान, राम शिंदेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 3:48 PM
Share

अहमदनगर : भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी परळीत करुणा शर्मा यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि अटकेवरून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय. परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत जे काही घडले त्यावरून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान रचल्याचे दिसून येत आहे, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केलाय. अशा प्रकारे राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कोणावर अन्याय करण्याची भूमिका दिसून येत असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राम शिंदे यांनी केलीये. तसेच प्रसारमाध्यमांमधून घटनेच्यावेळचे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून हे मोठे कारस्थान असल्याचे दिसतं, असंही त्यांनी म्हटलं.

राम शिंदे म्हणाले, “भारतात सर्वांना स्वातंत्र्य आहे. स्वतःचे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अस असताना परळीत जे घडलं आणि सोशल मीडियावर जे पाहायला मिळालं ते चुकीचं आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे सत्य आहे ते समोर यायला हवं. शेवटी कुणाला अडवून, कुणाला दडवून काम होणार नाही. परंतु राज्यातील एखाद्या मंत्र्यानं अशा अन्याय आणि अत्याचाराची भूमिका घेतली तर त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.”

“प्रचंड गर्दीत एक माणूस गाडीच्या डिक्कीत वस्तू ठेवतो, याची चौकशी झाली पाहिजे”

“हा कट आहे. इतक्या मोठ्या गर्दीत एक माणूस चालू गाडीची डिक्की उघडतो. त्याच्या हातातील वस्तू ठेवतो, दुसऱ्या बाजूचा माणूस डिक्की बंद करतो. त्यासाठी पोलीस त्याच्या शेजारी उभा असतो. या परिस्थितीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. यात मोठं कटकारस्थान आहे. त्यामुळे याची चौकशी होऊन सत्य जगासमोर आलं पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ नये. शेवटी हे राज्य कायद्याचं आहे. मंत्र्यांनी जी शपथ घेतली आहे त्याप्रमाणे वागून न्याय झाला पाहिजे,” असंही राम शिंदे यांनी नमूद केलं.

“वकील, अधिकाऱ्याला अटक आणि आरोपी फरार, हे पहिल्यांदा घडतंय”

राम शिंदे यांनी यावेळी ईडीच्या चौकशीवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समाचार घेतला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. केंद्रीय मंत्र्यांना आपण अटक करतो, मात्र माजी गृहमंत्री सापडत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय. खरंतर माजी गृहमंत्र्यांनी स्वतःहून चौकशीसाठी हजर झालं पाहिजे, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. कदाचित त्यांना काठीची भीती वाटत असेल, असा टोलाही राम शिंदे यांनी देशमुखांना लगावला.

हेही वाचा :

माझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल, फडणवीस, राणे नेमकं काय म्हणाले?

करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, ड्राव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी

व्हिडीओ पाहा :

BJP leader Ram Shinde criticize Dhananjay Munde over Karuna Sharma arrest

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.