AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पुराच्या पाण्यात बाईक घालण्याचं धाडस अंगलट, कृषी केंद्र संचालकाचा वाहून गेल्याने मृत्यू

नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने कृषी केंद्र संचालक चंदू बिल्लावार यांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील भेदोडा गावाजवळ ही घटना घडली

VIDEO | पुराच्या पाण्यात बाईक घालण्याचं धाडस अंगलट, कृषी केंद्र संचालकाचा वाहून गेल्याने मृत्यू
चंदू बिल्लावार
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 8:46 AM
Share

चंद्रपूर : नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने चंद्रपुरात कृषी केंद्र संचालकाचा मृत्यू झाला. पुराच्या पाण्यातही बाईक चालवण्याचं धाडस 55 वर्षीय चंदू बिल्लावार यांच्या जीवावर बेतलं. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बिल्लावार यांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने कृषी केंद्र संचालक चंदू बिल्लावार यांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील भेदोडा गावाजवळ ही घटना घडली. भेदोडा गावाजवळील नाल्याला पूर आला असताना देखील चंदू बिल्लावार यांनी पाण्यात आपली बाईक घातली. मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. साखरवाही ते विरुर या दरम्यान नाल्यात त्यांचा मृतदेह आढळला.

झाडावर अडकल्याने तरुण बचावला

दरम्यान, अन्य एका घटनेत नांदा फाटा येथे नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण सुदैवाने बचावला. नांदा फाटा येथे रस्त्यावरुन पावसाचे पाणी जात असताना देखील 29 वर्षीय युवक पाण्यातून चालत गेला. मात्र तोल जाऊन पाण्यात पडल्याने दिलीप चिमुलवार पाण्यात वाहून गेला. सुदैवाने समोर एका झाडाला अडकल्याने त्याला वाचवण्यात यश आले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video | पुराच्या पाण्यात बैलगाडी नेण्याचा प्रयत्न अंगलट, बैलाचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता

महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज

(Chandrapur Director of Agriculture Center flown away while riding bike in flood water)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.