जिल्ह्याचे पालकमंत्री हरविले आहेत, मदतीसाठी आम्ही कुणाकडे जायचं?, यवतमाळच्या शेतकऱ्यांचा समस्येचा पाढा

यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे जिल्ह्यात अपवादाने येतात, त्यांचं कुठं संपर्क कार्यालय नाही, मग आम्ही मदत मागण्यासाठी कुठं जायचं?, असा सवाल शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनी केलाय.

जिल्ह्याचे पालकमंत्री हरविले आहेत, मदतीसाठी आम्ही कुणाकडे जायचं?, यवतमाळच्या शेतकऱ्यांचा समस्येचा पाढा
भुमरे यांचं यवतमाळमध्ये संपर्क कार्यालय नाही. शेतकऱ्यांनी समस्यांचे निवेदन द्यायचे कुणाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यवतमाळ : आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हरविले आहेत, मदतीसाठी आम्ही कुणाकडे जायचं?, असा सवाल करत यवतमाळच्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा टीव्ही 9 मराठीला सांगितल्या. नव्याने नियुक्त केलेले पालकमंत्री संदीपान भुमरे जिल्ह्यात अपवादाने येतात, त्यांचं कुठं संपर्क कार्यालय नाही, मग आम्ही मदत मागण्यासाठी कुठं जायचं?, असा सवाल शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनी केलाय.

हरवलेल्या पालकमंत्र्यांना शोधून द्या

भुमरे यांचं यवतमाळमध्ये संपर्क कार्यालय नाही. शेतकऱ्यांनी समस्यांचे निवेदन द्यायचे कुणाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हरवलेल्या पालकमंत्र्यांना शोधून दिल्यास शेतकरी संबंधितांचं स्वागत करतील, असं उपरोधाने शेतकरी नेते मनीष जाधव म्हणाले.

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा समस्येचा पाढा

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. शेतकरी अनेक संकटात सापडले आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, व्यापारी फसवणूक करीत आहेत. पिकविम्याचा लाभ मिळत नाही. पालकच नसल्याने न्याय कुणाकडे मागावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयाकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी जिल्ह्याला पालकमंत्री द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

राठोडांना हटवलं, भुमरेंकडे जबाबदारी

एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांना वन मंत्रालयाचा राजीनामा द्यावा लागला. याच वेळी यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरुन देखील त्यांची गच्छंती झाली. त्यानंतर यवतमाळच्या पालकमंत्रिपदी संदीपान भुमरे यांची नियुक्ती करण्यात आली.

(Complaints of farmers against Yavatmal Guardian Minister Sandipan Bhumare)

हे ही वाचा :

“भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, पक्ष फुटण्याच्या भीतीने राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात”

अनिल परबांच्या समर्थनासाठी शिवसैनिक पुढे सरसावले; मुंबईत लागले बॅनर्स

…म्हणून देशातील जुनी वाहने भंगारात काढणे गरजेचे: नितीन गडकरी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI