AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल – डिझेल दरवाढीचा निषेध, काँग्रेस नेते बैलगाडी, सायकलवरून पिपाणी वाजवत तहसील कार्यालयात

केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आज गंगाखेड काँग्रेसकडून जोरदार निषेध नोंदवण्यात आला.

पेट्रोल - डिझेल दरवाढीचा निषेध, काँग्रेस नेते बैलगाडी, सायकलवरून पिपाणी वाजवत तहसील कार्यालयात
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 3:38 PM
Share

परभणी : केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आज गंगाखेड काँग्रेसकडून जोरदार निषेध नोंदवण्यात आला. ही दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे स्थानिक नेते – कार्यकर्ते बैलगाडी आणि सायकलवरून तहसील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दरवाढीच्या निषेथार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Congress protest against petrol, diesel price hike, Leaders visits tehsil office in bullock carts and bicycles)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या आहेत. असे असतानाही केंद्र सरकार इंधनावरील अधिभार कमी करायला तयार नाही. ही सर्वसामान्य नागरिकांची लूट असून सामान्यांच्या खिशावरील दरोडाच असल्याची खरमरीत टिका यावेळी करण्यात आली. ही दरवाढ तात्काळ न रोखल्यास आगामी काळात कॉंग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती बाळकाका चौधरी, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, संयोजक – तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, न. प. सदस्य नितीन चौधरी, महिला प्रदेश सदस्या प्रा. शुभांगी शिसोदिया, युवक जिल्हाध्यक्ष प्रणित खजे, महिला तालुकाध्यक्षा प्रा. जयश्री पछाडे, अल्पसंख्यक सेलचे मराठवाडा ऊपाध्यक्ष मुशरफ खान, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रोहिदास घोबाळे, युवकचे सरचिटणीस, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव, गोपीनाथराव भोसले, सुशांत चौधरी, साहेबराव चौधरी, आदित्य चौधरी, युवक शहराध्यक्ष नागेश डमरे, भांबारवाडीचे सरपंच गोविंदराव भांबरे, कांताबाई कुरूडे, रंजनाबाई भालेराव, गोविंद शिंदे, नरेंद्र मस्के, रमेश मुंडे, नामदेव चव्हाण, अभिजीत चौधरी, प्रथम यादव आदिंसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

हलगी-पिपाण्यांनी वेधले लक्ष

बैलगाड्या आणि सायकलवरून स्थानिक नेते मंडळी तहसील कार्यालयात दाखल झाले. बैलगाड्या आणि सायकलींच्या पुढे हलगी – पिपाणीचे पारंपरिक वादक सहभागी करण्यात आले होते. हलगीच्या कडकडाटासह पिपाणीचा सूर शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते.

इतर बातम्या

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलं, भरती नसताना मिठी नदीला पूर आला, मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?; शेलारांची भीती

ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅक्शन मोडवर, कंबरभर पाण्यातून वाट कढत तोडली संरक्षक भिंत; पूरस्थिती टळली

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा; सचिन सावंत यांची मागणी

(Congress protest against petrol, diesel price hike, Leaders visits tehsil office in bullock carts and bicycles)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.