AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक, शिर्डीमध्ये ‘दे धक्का’ आंदोलन, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

इंधन आणि गॅस दरवाढ तसेच महागाईविरोधात कॉंग्रेसच्या वतीने आज (10 ऑक्टोरब) शिर्डी येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले. शिर्डी शहरातील नगरपंचायत समोरुन दुचाकीला ढकलत नेत काँग्रेसने हे आंदोलन केले आहे.

इंधन दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक, शिर्डीमध्ये 'दे धक्का' आंदोलन, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
SHIRDI CONGRESS PROTEST
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 4:45 PM
Share

अहमदनगर : मागील काही महिन्यापासून इधन तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलिंडर तब्बल 15 रुपयांनी महागला. हाच मुद्दा घेऊन काँग्रेस आक्रमक झाली आहे. इंधन आणि गॅस दरवाढ तसेच महागाईविरोधात कॉंग्रेसच्या वतीने आज (10 ऑक्टोरब) शिर्डी येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले. शिर्डी शहरातील नगरपंचायत समोरुन दुचाकीला ढकलत नेत काँग्रेसने हे आंदोलन केले.

इंधन दरवाढीविरोधात कांग्रेसची जोरदार घोषणाबाजी

साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, विधानसभेचे नेते सुरेश थोरात आणि कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या नेत्वृवाखाली हे आंदोलन करण्यात आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुचाकीला काँग्रेस पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. तसेच गॅस दरवाढ आणि इंधन दरवाढीमुळे भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर हे दे धक्का आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिर्डी शहरातील नगरपंचायतीसोर दुचाकीला ढकलत नेत हे आंदोलन केले आहे.

लखीमपूर खेरी हिसांचाराचा निषेध

तसेच या आंदोलनात लखीमपूर खेरी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी शेतकही हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. केंद्रातील सरकार अन्याय करणारे आहे, असे म्हणत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ

तर दुसरीकडे दसरा आणि दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच सामान्य नागरिकांना महागाईचा तडाखा बसणार आहे. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि पीएनजीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 6 ऑक्टोबरपासून घरगुती वापराच्या LPG साठी वाढीव दर जाहीर केले आहेत. त्यानुसार विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 844.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतकी झाली आहे. तर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरचा दर 884.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतका झाला आहे.

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीसाठी 1736.50 रुपये मोजावे लागणार  

काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलिंडरचा (LPG) भाव वाढवण्यात आला होता. एलपीजीचा भाव एक-दोन रुपयांनी नव्हे तर 43.50 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स, रेस्टारंट किंवा ढाबे अशा सगळ्यांनाच झळ बसणार आहे. या सगळ्यांकडून खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्या गेल्यास त्याचा अंतिम फटका सामान्य नागरिकांनाच बसणार आहे. दिल्लीत व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीसाठी 1736.50 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी ही किंमत 1693 रुपये इतकी होती. तर कोलकातामध्ये हाच दर 1805 रुपये इतका झाला आहे.

इतर बातम्या :

राष्ट्रवादीत सर्व रडे, तपास यंत्रणांची कारवाई होताच रडू लागतात; निलेश राणेंचा घणाघाती हल्ला

मुख्यमंत्री काल सिंधुदुर्गात आले, आज निलेश राणेंचा शिवसेनेला झटका; पंचायतीतील सेनेच्या तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आधी चीन, नंतर लेबनॉन, आणि आता देश-महाराष्ट्र अंधारात बुडणार? विजेचं संकट कसं काय? वाचा सविस्तर

(congress protest in shirdi against gas cylinder and petrol diesel price hike)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.