Satara Unlock : साताऱ्यातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, नवे नियम लागू, काय सुरु काय बंद?

साताऱ्यातील कोरोना संसर्गाचा दर कमी झाल्यानं जिल्हा प्रशासनाने आता अनलॉक करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथिल करण्यात आलेत.

संतोष नलावडे

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 06, 2021 | 10:14 PM

सातारा : साताऱ्यातील कोरोना संसर्गाचा दर कमी झाल्यानं जिल्हा प्रशासनाने आता अनलॉक करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. सातारा जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड्स टक्केवारी यानुसार एकूण 5 स्तर निश्चित करण्यात आलेत. त्या स्तरानुसार जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत (Corona infection rate in Satara decreases know all about new rules of Unlock).

सातारा जिल्ह्यामध्ये कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्स व्यापल्याच्या निकषानुसार शासनाने घोषित केलेल्या स्तरानुसार, सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.

साताऱ्यात काय बंद काय सुरू?

  • सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी.
  • अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, डेअरी, बेकरी, मटन, चिकन, अंडी इतर खाद्य पदार्थाचा समावेश.
  • आरोग्य सेवेशी निगडित मेडिकल सेवा पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी.
  • हाॅटेल, रेस्टाॅरंटमधील घरपोच पार्सल सेवेला परवानगी.
  • सार्वजनिक मैदानावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 5 ते 9 यावेळेत फिरण्यास परवानगी.
  • सार्वजनिक तसेच गर्दीच्या कार्यक्रमांना मात्र प्रशासनाची कडक नियमावली.
  • शनिवार, रविवार जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू.

कोणते निर्बंध लागू राहणार?

सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत सायं. 5.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत तसेच आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करणेत आलेली आहे. त्यामुळे वैध कारणाशिवाय कोणत्याही नागरीकास संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक बाबींची दुकाने/आस्थापना या सकाळी 9.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल/औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. हॉस्पीटलमधील मेडिकल/औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकान/आस्थापना या पूर्णपणे बंद राहतील. मॉल/सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/नाटयगृहं पूर्णपणे बंद राहतील.

हॉटेल, रेस्टॉरन्टला केवळ पार्सल घरपोचसाठी परवानगी

हॉटेल, रेस्टॉरन्ट ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही. लॉजिंग सुविधा पूर्णपणे बंद राहील. बार, परमिटरुम व वाईन शॉप इत्यादींबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. सार्वजनिक जागा/खुली मैदाने/चालणे/सायकल चालविणे यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत परवानगी असेल. आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवारी याला मनाई आहे. ज्या खासगी कार्यालयांना मुभा देण्या आलेली आहे अशी कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

खुल्या जागेतील क्रिडा प्रकारांना सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी

शासकीय कार्यालये व ज्या खासगी कार्यालयांना परवानगी देण्यात आलेली आहे, अशा कार्यालयांना 25 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत चालू ठेवणेस परवानगी असेल. आठवड्याचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार यास मनाई आहे. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल.

आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरणास परवानगी

आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर कोणालाही संचार / प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही.

लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल, 25 लोकांनाच परवानगी

सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल/कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेशामधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.

नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करावी. तसेच कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास रक्कम रु 25,000/- इतका दंड आकारला जाईल. शासनाचे दि. 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील. जास्तीत जास्त 20 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करण्यया परवानगी असेल. बैठका/निवडणुक – स्थानिक संस्थांच्या / सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी असेल.

शेतीविषयक कोणत्या दुकानांना सूट?

ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल, अशा बांधकामांना परवानगी देण्यात येत आहे. शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने दुपारी 02.00 वा पर्यत चालु ठेवणेस परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करण्याची सेवा करणेस सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल. ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा या फक्त्‍ अत्यावश्यक बाबीसाठीच चालू ठेवण्यास परवानगी असेल. सातारा जिल्हयात संचार बंदी लागू करणेत येत आहे. केश कर्तनालय व सौदर्य केंद्रे येथे फक्त लस घेतलेल्या ग्राहकांसाठीच, अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी दुपारी 2.00 वा. पर्यत चालु ठेवण्यास परवानगी राहील. व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर बंद राहतील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 50 टक्के क्षमतेने चालु ठेवणेस परवानगी राहील.

कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाही

कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नसेल. मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक/ मदतनीस/ क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल. खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/ लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतु सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल. उत्पादन क्षेत्र – निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLE मध्ये असावी.

उत्पादनाशी संबंधित कुणाला परवानगी

1. जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल / पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी)

2. सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत.

3. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग.

4. डाटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर / आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता – अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवणेस परवानगी असेल.

सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLE मध्ये असावी. उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवणेस परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल ISOLATION BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील. शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास परवानगी असेल.

सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना

ज्या आस्थापनांना दुपारी 02.00 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी देणेत आली आहे त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 04.00 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी असेल. स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.

हेही वाचा :

कोरोना काळात 225 ‘पॉझिटिव्ह’ गर्भवतींची प्रसुती, कराडच्या कृष्णा रुग्णालयात नर्स झाल्या ‘यशोदा’

साताऱ्यानं राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना पॉझिटिव्हीटीमध्ये अग्रेसर, मृत्यूदर कमी करण्याचं आव्हान

आजोबांना घरी न्या, उपचारांचा काही उपयोग नाही, 93 वर्षीय वृद्धाने कोरोनासोबत डॉक्टरांनाही हरवलं

व्हिडीओ पाहा :

Corona infection rate in Satara decreases know all about new rules of Unlock

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें