AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने, नेमका वाद काय?

इस्लामपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर काँग्रेसने दावा केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचा वाद थेट दिल्लीपर्यंत गेला आहे.

मोठी बातमी! सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने, नेमका वाद काय?
| Edited By: | Updated on: Aug 04, 2023 | 11:09 PM
Share

सांगली| 4 ऑगस्ट 2023 : इस्लामपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर काँग्रेसने दावा केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचा वाद थेट दिल्लीपर्यंत गेला आहे. इस्लामपूरमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांनी इस्लामपूरमधील राष्ट्रवादीचे कार्यालय काँग्रेसच्या ताब्यात देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांची मागणी ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी या नेत्यांना शनिवारी (4 ऑगस्टला) महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलं.

कार्यालयावरून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. पक्ष कार्यालय राष्ट्रवादीचच आहे. आतापर्यंत काय झोपला होता का? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षाने केला आहे. तर कार्यालयात राजारामबापूंचा संबंध नाही. राजारामबापूंनी मालक होण्याचा प्रयत्न केला. भाड्याच्या घरात राहण्याने मालक होता येत नाही. जनाची नाही तर मनाची लाज ठेवा आणि कार्यालय मोकळ करा, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.

या वादविवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशाप्रकारे आमनेसामने आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पक्ष कार्यालयावरुन वाद झाले होते. पण आता कोल्हापुरात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत हा वाद सुरु असल्याचं समोर आलं आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.