गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंचा तालुक्यात भूकंपाचा धक्का

गडचिरोली आणि तेलंगाणा सीमेवरील जाफराबाद चाक (प्राणहिता नदी) तालुका सिरोंचा तसेच अहेरी, आष्टी या भागात सुद्धा हलके-मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे झटके जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंचा तालुक्यात भूकंपाचा धक्का
संग्रहित छायाचित्र.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंचा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंपाचे धक्के तेलंगणा राज्यातील मथिनी बेलमपल्ली मंचिरीयाल व महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेल्या अहेरी सिरोंचा तालुक्यात बसले. सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद पॅचपासून 77 किलोमीटर अंतरावरील परिसरात हे धक्के जाणवले असून जिल्‍हा प्रशासनाने कळविले व कुठलीही जीवितहानी नाही. अहेरी तालुक्यातील अहेरी आलापल्ली राजाराम जिम्मलगट्टा गोमणी व सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद पॅच बामनी सिरोंचा सिरोंचा माल या भागात भूकंपाचे धक्के जास्त जाणवले. (Earthquake shakes Aheri Sironcha taluka in Gadchiroli district)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी भूकंपाचे केंद्र असून 77 किमी खोलीसह सायंकाळी 6.48 वाजता 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गडचिरोली आणि तेलंगाणा सीमेवरील जाफराबाद चाक (प्राणहिता नदी) तालुका सिरोंचा तसेच अहेरी, आष्टी या भागात सुद्धा हलके-मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे झटके जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.

गेल्या आठवड्यात सातारा आणि रत्नागिरीला भूकंपाचे धक्के

गेल्या आठवड्यात सातार जिल्ह्यातील पाटण तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यालाही भूकंपाचे धक्के जाणवले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसरात रविवारी 3.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य स्वरुपाचा धक्का बसला. सौम्य स्वरूपाच्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू हा कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर होता. तर भूकंपाची जमिनीतील खोली 11.37 किलोमीटर अंतरावर होती. भूकंपाने कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फ संगमेश्वर येथील सुतारवाडीला जमिनीपासून 5 किमी अंतरावर भूकंपाचा धक्का बसला आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत या भागात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त हाती आले नव्हते. दरम्यान दक्षिण भारतात भूकंपाच्या 3 आणि 4 या अत्यंत महत्वाच्या झोनमध्ये रत्नागिरी जिल्हा येत असल्याने या भूकंपामुळे धाकधूक वाढली आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी रत्नागिरी जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपाचे हे केंद्र संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर येथील सुतारवाडी येथे जमिनीपासून 5 मी अंतरावर 4.5 रिश्टर स्केलचा धक्का बसला. या धक्क्यामुळे कोणते नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले नव्हते. मात्र भूकंपाचा हा धक्का चांगलाच जोरदार होता. (Earthquake shakes Aheri Sironcha taluka in Gadchiroli district)

इतर बातम्या

भाईंदर रेल्वे स्टेशन, 24 लाखांची तांब्याची वायर आणि 29 चोरटे, रेल्वे पोलिसांनी पद्धतशीरपणे आरोपींच्या मुसक्या आवळल्या

आदित्य ठाकरे मांडी घालून बसले, विद्यार्थिनीला टाळी देत संवाद, बाळासाहेबांच्या नातवाचा हटके अंदाज काँग्रेस नेत्याला भावला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI