Satara District Bank Election | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 21 नोव्हेंबरला मतदान

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे.

Satara District Bank Election | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 21 नोव्हेंबरला मतदान
SATATRA DISTRICT BANK
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 6:22 PM

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

21 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी 

कोरोना महामारीमुळे जिल्हा बँकेची निवडणूक तब्बल पाच वेळा पुढे ढकलण्यात आली. मगील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे 25 ऑगस्ट रोजी बँकेच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्यात आली. या निर्णयानंतर निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 18 ऑक्टोबपासून 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 17 ते 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पार पडेल. या निवडणुकीत एकूण 1964 मतदार मतदान करतील.

जळगाव जिल्हा बँकेच्या निडणुकीची रणधुमाळी, काँग्रेस स्वबळावर

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे येथील वातावरण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे जळगावमध्येही निवडणुकीचा धुरळा उडालाय. येथे अजिंठा विश्रामगृहावर 16 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादी नेते तथा माजी आमदार सतीष पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आदी नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत  काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.

काँग्रेसच्य भूमिकेमुळे भाजपचा स्वबळाचा नारा 

तर दुसरीकडे काँग्रेसच्या या भूमिकेमुळे भाजपनेही स्वबळाची तयारी केली आहे. भाजपने सर्व 21 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेतही विरोधकांना धक्कातंत्र देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

इतर बातम्या :

Photo | हॉटेल सोडताना रुममधून घेऊन जाऊ शकता 9 वस्तू, चोरी समजली जाणार नाही !

प्रकाश आंबेडकर राजकारणात सक्रीय, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांना मोलाचा सल्ला

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत 2869 उमेदवारांच्या तक्रारी; नाशिकमध्ये संचालकांनी केले शंका निरसन

(election program of Satara District Central Bank has announced Voting for 21 seats will be on 21 November)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.