मोतिलाल अहिरे, टीव्ही 9 मराठी, जळगाव : परिवहन विभागात कार्यरत डेपोटी आरटीओ दर्जाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानी आणि काही ठिकाणी ईडीने छापे घातल्यानं महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचीही चौकशी होणार आहे. परिवहन खात्यात सुरू असलेल्या या भ्रष्ट्राचारा विरोधात पहिली तक्रार गजेंद्र पाटील यांनी केली होते. त्यात खरमाटे यांचं देखील नाव होतं. याचविषयीचा हा खास रिपोर्ट.