सोलापुरातील बोरामणी विमानतळासाठीच्या जमीन अधिगृहणाचा प्रस्ताव फेटाळला, माळढोक संरक्षणासाठी वन विभागाचा निर्णय

रोहित पाटील

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 7:44 AM

सोलापूरच्या विमानसेवेला आता आणखी एक अडथळा आला आहे. प्रस्तावित बोरामणी विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळला आहे. वनविभागाने हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे आता विमानतळ उभारणीसाठी काय तोडगा काढावा यावर विचार केला जात आहे.

सोलापुरातील बोरामणी विमानतळासाठीच्या जमीन अधिगृहणाचा प्रस्ताव फेटाळला, माळढोक संरक्षणासाठी वन विभागाचा निर्णय
सांकेतिक फोटो
Follow us

सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेला आता आणखी एक अडथळा आला आहे. प्रस्तावित बोरामणी विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळला आहे. वनविभागाने हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे आता विमानतळ उभारणीसाठी काय तोडगा काढावा यावर विचार केला जात आहे.

वनखात्याच्या समितीने प्रस्ताव फेटाळला

सोलापुरात नव्याने होऊ घातलेल्या बोरामणी विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जवळपास 573 हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. मात्र नियोजित विमानतळाच्या आराखड्यात वनविभागाची देखील जवळपास 33.72 हेक्टर जमीन आहे. विशेष म्हणजे दुर्मिळ माळढोक अभयारण्याची ही जमीन आहे. या राखीव वनजमिनीच्या निर्वनीकरणाचा प्रस्ताव वनविभागाकडे पाठवण्यात आलेला होता. मात्र वनखात्याच्या प्रादेशिक अधिकार समितीने (आरईसी-रिजनल ईम्पॉवर्ड कमिटी) निर्वनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला आहे.

माळढोक नामशेष होत आहे, संवर्धन करणे आवश्यक 

प्रस्ताव फेटाळत माळढोक नामशेष होत असल्याने त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. त्यामुळे आधीपासून असलेल्या होटगी रोड विमानतळाच्या सेवेत सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरतेय. तर दुसरीकडे प्रस्तावित बोरामणी विमानसेवेत माळढोकमुळे अडथळा निर्माण होतोय. त्यामूळे सोलापूरकरांच्या विमानसेवेचे स्वप्न कधी पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय.

चिपी विमानतळाचे 7 ऑक्टोबर उद्घाटन

कोकणातील चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या विषयावरुन तर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. या विमानसेवेची सुरुवात होण्यासंबंधीची घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यापूर्वी केलेली आहे. 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळावरुन विमान वाहतूक सुरु होईल. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी आपण स्वत: आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असतील, अशी माहिती राणे यांनी दिली होती.

इतर बातम्या :

विद्यार्थी म्हणतो शिक्षकांनी मारहाण केली, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर खरा प्रकार समोर, महाविद्यालयाची पोलिसात तक्रार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आघाडी होणार का? जयंत पाटलांनी सांगितला फॉर्म्यूला

काँग्रेसची मागणी धूडकावली? तीन सदस्यीय प्रभाग प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला, शिक्कामोर्तब होणार?

(Forest Department rejected proposal of land acquisition for Ramani kolhapur Airport)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI