गोंदियात चार युवकांचा नदीत बुडून मृत्यू, मृतदेहांचा शोध सुरु, बुलडाण्यात तरुण वाहून गेला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 6:42 PM

गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील काळीमाती या गावातील तरुण मारबत घेऊन मानेकसा जवळील बागनदी जवळ येथे गेले होते. यावेळी युवकांना अंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही, यात चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

गोंदियात चार युवकांचा नदीत बुडून मृत्यू, मृतदेहांचा शोध सुरु, बुलडाण्यात तरुण वाहून गेला
संग्रहित छायाचित्र.

Follow us on

मुंबई: गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील काळीमाती या गावातील तरुण मारबत घेऊन मानेकसा जवळील बागनदी जवळ येथे गेले होते. यावेळी युवकांना अंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. नदी पात्रात सात तरुण उतरले असता खोल पात्रात जाऊन त्यापैकी चार युवकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुमित शेंडे 16 वर्ष ,रोहित बहेकार 16 वर्ष ,संतोष बहेकार 16 वर्ष , प्रणय खोब्रागडे 19 वर्ष यांचा समावेश आहे. चारही युवक वर्ग 11 वीमध्ये शिक्षण घेत होते.

शेगाव तालुक्यात युवक वाहून गेला

काल रात्रीपासून मुसळधार पावसानं बुलडाणा जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर आजही पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेय. शेगाव तालुक्यातील जवळा बु. या गावातील एक 18 वर्षीय युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला तर खामगाव, शेगाव नांदुरा आणि मलकापूर शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने रात्री पासून तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झालेय.

रात्रीपासून पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलंय त्यामुळे रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळं शेगाव तालुक्यातील जवळा बु. या गावातील 18 वर्षीय आदित्य संतोष गवई हा युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेलाय, अद्याप पर्यंत हा युवक मिळून आलं नाही.. तर खामगाव, शेगाव नांदुरा आणि मलकापूर शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने रात्री पासून तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झालेय.. खामगावात तर शहरातून वाहणाऱ्या फारशी नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात घुसले. तर, नाल्यात वाहून जाणाऱ्या 5 गाई वाचल्या आहेत.

नदी नाल्यांना पूर

बुलडाणा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस तर काही भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर शेतकरी सुद्धा आनंदित झालाय असून पिकांना जीवदान मिळालंय.  खामगाव तालुक्यात ही मुसळधार पाऊस सुरू असून फरशी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. सुटाळपुरा रस्त्यावरून ही पाणी वाहत आहे. पुराचे पाणी वाढत चालले असून जुन्या शहरातील लोकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. तर, जिल्ह्यात ही अनेक नाल्याना पूर आलाय. महत्वाचे म्हणजे धरण क्षेत्रात ही पाणी पातळी वाढली असून पिण्याची पाणी टंचाई मिटणार आहे.  खडकपूर्णा प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

नांदेडमध्ये कार वाहून गेली 1 बचावला, दोघांचा शोध सुरु

नांदेड जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती नर्माण झाली होती. कारमध्ये वाहून गेलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलं आहे. पुरातून वाहत जाताना झाडावर अडकलेल्या व्यक्तीला दोरीच्या साहाय्याने वाचवण्यात आलं आहे. कारमधील दोघेजण बेपत्ता आहेत. आमदार तुषार राठोड यांचा पुतण्या संदीप राठोड आणि चुलत भाऊ भगवान राठोड या दोघांचा शोध सुरु आहे.

अमरावतीत घरात पाणी घुसलं

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात असणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर या गावामध्य मुसळधार पाऊस आल्याने पावसाचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे. मुसळधार पावसामुळे येथील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.तर, शेतामध्ये बांधन्यात आलेले कृत्रिम बांध फुटल्याने संपूर्ण साचलेलं पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने नागरिकांच्या घरातील धान्यसाठा, वस्तू ,भांडे ,कपडे, इलेक्ट्रॉनिक ऊपकरणे आदींचे अतोनात नुकसान झालेले आहे.

इतर बातम्या:

MHT CET Exam Schedule : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची अजित पवारांची ग्वाही

Four Person drowned in Gondia Bag River one person drowned in flood

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI