Hasan Mushrif Ed raid : हसन मुश्रीफ यांच्या कोणकोणत्या नातेवाईकांच्या घरी छापेमारी?; मुश्रीफ म्हणतात, विशिष्ट समुदायाला टार्गेट…

आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली. आता माझ्यावर. नंतर अस्लम शेख यांच्यावर कारवाई करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणत आहेत.

Hasan Mushrif Ed raid : हसन मुश्रीफ यांच्या कोणकोणत्या नातेवाईकांच्या घरी छापेमारी?; मुश्रीफ म्हणतात, विशिष्ट समुदायाला टार्गेट...
हसन मुश्रीफ यांच्या कोणकोणत्या नातेवाईकांच्या घरी छापेमारी?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 12:05 PM

कोल्हापूर: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. त्यानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सविस्तर माहिती घेऊन या प्रकरणावर मी बोलणार आहे, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आपल्याच नव्हे तर इतर नातेवाईक आणि मुलीच्या घरावरही छापेमारी करण्यात आल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. तसेच विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या नातेवाईकांच्या घरावर आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे मारल्याचं समजतंय. मी काही कामानिमित्ताने बाहेर असल्याने फक्त दूरध्वनीवरून मला ही बातमी समजली आहे. कारखाना, निवासस्थान आणि सर्व नातेवाईकांची घरं तपासण्याचं काम सुरू आहे, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्त्यांनी कागल तालुका बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. ती कृपया मागे घ्या. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करा ही विनंती करतो. कोणताही दंगाधोपा किंवा कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य माझ्यासाठी करू नका ही विनंती आहे. सर्व माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी शांतता ठेवावी, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे.

यापूर्वीही दीड दोन वर्षापूर्वी अशा प्रकारचे छापे पडले होते. सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. पुन्हा कशासाठी हा छापा घालण्यात आला याची मला माहिती नाही. 30-35 वर्षाचं माझं सार्वजनिक जीवन लोकांच्या समोर आहे.

त्यामुळे दीड दोन वर्षात जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं. कोणत्या हेतूने छापा मारला हे माहीत नाही. मी सर्व माहिती घेतल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर खुलासा करीलच. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजपच्या एका नेत्याने दिल्लीत अनेक वेळा चकरा मारून माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, मुश्रीफांवर कारवाई होणार आहे.

अशा पद्धतीने नाऊमेद करण्याचं काम सुरू आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होत असेल तर याचा निषेध केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली. आता माझ्यावर. नंतर अस्लम शेख यांच्यावर कारवाई करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणत आहेत. विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्याचं ठरवलं की काय अशी शंका होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

तदरम्यान, चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील ब्रिक्स इंडिया कंपनीत ईडीने छापेमारी केली आहे. गायकवाड यांच्या घरीही ईडीचे अधिकारी छापेमारी करत आहेत. चंद्रकांत गायकवाड हसन मुश्नीफांचे व्यावसायिक भागिदार आहेत. ब्रिक्स इंडिया कंपनीत चौथ्या मजल्यावर ही छापेमारी सुरू आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.