अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात मुसळधार पाऊस, पाथर्डीचा पूल वाहून गेला, 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला

अकोला जिल्हातल्या तेल्हारा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी येथील पूल वाहून गेलाय. त्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला असून शेतीचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (heavy Rain Aloka telhara taluka Flooded Carried bridge)

अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात मुसळधार पाऊस, पाथर्डीचा पूल वाहून गेला, 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला
अकोला जिल्हातल्या तेल्हारा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी येथील पूल वाहून गेलाय...

अकोला : अकोला जिल्हातल्या तेल्हारा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी येथील पूल वाहून गेलाय. त्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला असून शेतीचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (heavy Rain Aloka telhara taluka Flooded Carried bridge)

अकोट राज्य मार्गाचे गेल्या 2 वर्षापासून काम सुरु आहे. त्यामुळे सर्वीच कडे रस्ते खोदून ठेवले आहेत. तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाथर्डी येथील पूल वाहून गेल्याने जास्तगाव, राणेगावं,भोकर,वरुड, सिरसोली,पाथर्डी आणि टाकळी या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग बनवून देण्यात यावा ही मागणी गावकरी करीत आहे.

युवा पत्रकाराच्या उपोषणाला तालुक्याचा पाठिंबा

तेल्हारा तालुक्यातील खराब रस्त्यासाठी गेल्या पाच दिवसापासून युवा पत्रकार विशाल नांदोकर यांनी आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाला पाठिंबा म्हणून काल संपूर्ण तेल्हारा तालुका बंद होता. या खराब रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील सर्वच रस्ते खोदून ठेवल्याने या पावसाळ्यात तालुक्यातील नागरिकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे.

(heavy Rain Aloka telhara taluka Flooded Carried bridge)

हे ही वाचा :

पाणी साचलेल्या रस्त्यावरुन चालणे कठीण, नवरीला थेट खांद्यावर उचललं, नवरदेवाची एकच चर्चा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI