चिपळूणला पुराचा फटका का बसला?, पाटबंधारे विभागाचा अहवाल सरकारकडे; दिलं ‘हे’ कारण!

चिपळूणमध्ये अतिवृष्टी झाल्याने महापूर आला. त्यामुळे संपूर्ण चिपळूणमध्ये हाहा:कार उडाला आहे. पाटबंधारे विभागाने चिपळूणच्या महापुराबाबतची कारणमिमांसा केली असून त्याचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला पाठवला आहे. (chiplun floods)

चिपळूणला पुराचा फटका का बसला?, पाटबंधारे विभागाचा अहवाल सरकारकडे; दिलं 'हे' कारण!
chiplun flood
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 11:28 AM

चिपळूण: चिपळूणमध्ये अतिवृष्टी झाल्याने महापूर आला. त्यामुळे संपूर्ण चिपळूणमध्ये हाहा:कार उडाला आहे. पाटबंधारे विभागाने चिपळूणच्या महापुराबाबतची कारणमिमांसा केली असून त्याचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला पाठवला आहे. मुसळधार पाऊस झाल्यानेच चिपळूणमध्ये महापूर आल्याचं या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. तसेच महापूर नियंत्रणात आणण्यासाठी काही उपायही सूचवले आहेत. (heavy rain is the main reason of flood in chiplun: report)

चिपळूणमधील महापुराला मुसळधार पाऊस जबाबदार असल्याचं पाटबंधारे खात्याच्या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. मुख्य बाब म्हणजे जगबुडीचे पाणी वाशिष्ठीला मिळाल्यानं फुगवटा निर्माण झाल्याचा उल्लेख देखील यामध्ये करण्यात आलेला आहे. तर, कोळकेवाडी धरणातून 8 हजार 400 क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलं आहे.

चिपळूण पुराची कारणमीमांसा

1 ) रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सातत्यानं 4 ते 5 दिवस जोरदार पाऊस झाला. दिवसाला साधारण 200 ते 250 मिली मीटर पाऊस झाल्यानं पूरस्थिती उद्भवली. 2 ) सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोयना बॅक वॉटर, रघुवीर घाट आदी ठिकाणी प्रचंड पर्जन्यमान झाले. त्यामुळे पश्चिमेकडील मुक्त पाणलोटक्षेत्रामधून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही पूरस्थिती उद्धवली. 3 ) कोयना धरणामध्ये 2.67 लाख क्यूसेक्स ताशी सरासरीने पाणी आले. 24 तासात 15 ते 15 टीमसी इतकी पाण्याची आवक झाली. 3 ) भरतीच्या पाण्यामुळे नगीपात्रातील पाण्याचा समुद्रामध्ये निचरा होऊ शकलेला नाही. 4 ) याचवेळी रघुवीर घाट, सह्याद्री डोंगर माथ्यावरील पावसाने खेड तालुक्यातील जगबुडी नदीला आलेल्या पुरानं त्या ठिकाणची पाणी पातळी 7.50 मीटर झाली. अंदाजे पाणी 7000 ते 8000 क्यूसेक्स इतका विसर्ग नदीत होता. जगबुडी नदी चिपळूण शहराजवळच्या बहिरवली गावाजवळ वाशिष्ठीला मिळते. त्यामुळे या पाण्यानं चिपळूण शहरातील म्हणजेच वाशिष्ठी नदीतील पाणी थोपवले गेल्याची शक्यता निदर्शनास आली नाही. परिणामी चिपळूण शहरातील पूर ओसरला नाही. 5 ) कोळकेवाडी धरणातून वीजनिर्मिती करून 20 आणि 21 जुलै रोजी 3000 क्यूसेक्स तर 22 जुलै रोजी 8622 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू होता. 22 जुलै रोजी 21.10 द.ल.घ.मी तर 23 जुलै रोजी 10.8 द.ल.घ. मी. इतकेच पाणी कोळकेवाडीतून वाशिष्ठी नदीमध्ये सोडण्यात आले. कोळकेवाडीतूनद्वार संचलन करून पुराचे पाणी सोडण्यात आलेले नाही. परंतु कोळकेवाडी धरणाच्या पूर्ण संचय पातळीपर्यंत पाणीसाठा पोहोचत असल्यानं त्यांनी वीजनिर्मीती करून करून पाणी नियंत्रित करणे आवश्यकच होते. या विसर्गामुळे पूरस्थिती उद्धवली नाही. परंतु विसर्ग हा सतत चालू असल्यानं पूर उतरण्यास थोडासा विलंब झाला. 6 ) खेड आणि चिपळूण शहराचे क्षेत्र हे जलसंपदा विभागाने निषिद्ध पूर प्रवण क्षेत्र दर्शवणारी निळीपूर रेषा आणि नियंत्रित पूर प्रवण क्षेत्र दर्शवणारी लाल पूररेषा केलेल्या सर्वेक्षणानुसार निळी पूररेषाच्या क्षेत्रात येते. किमान सर्व बांधकामांची जोतापातळी अर्थात निळी पूररेषाच्या वर म्हणजेच एक मजला उंच करणे आवश्यक आहे. याबाबत पुनर्वसनाबाबत निश्चित धोरण आखणे आवश्यक आहे. कारण अतिवृष्टीच्या काळात दोन्ही शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असते. फक्त यावेळी पूरपातळीची उंची जास्त होती.

आवश्यक उपाययोजना

1 ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धरण आणि कालव्यांची आवश्यक दुरूस्ती करणे आवश्यक आहेच. त्याचबरोबर ज्या धरणांना गळती आहे, विमोचक नादुरूस्त आहेत इत्यादी धरण सुरक्षिततेची कामे तातडीनं हाती घेणे आवश्यक आहे. अतिवृष्टीमुळे धरणाचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेला नीही. परंतु कोकणातील अतिवृष्टी विचारात घेता उपरोक्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. 2 ) पूरपरिस्थिती अद्यावत माहिती अखंडपणे प्राप्त होत राहण्याकरता Atomization होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वयंचलित रेन गेज स्टेशन, स्वयंचलित रिव्हर गेज स्टेशन, अद्यावर रडार यंत्रणा व संपर्क साधण्यासाठी सॅटेलाईट यांची सुविधा आवश्यक आहे. 3 ) कृष्णा खोऱ्यामध्ये राबवण्यात येत असल्याप्रमाणे Real Time Data System ची यंत्रणा कोकणात प्रत्येक जिल्ह्यासाठी जलसंपदा विभागाचे जलविज्ञान विभागामार्फत उभारणे आवश्यक आहे. जेणेकरून पर्जन्यमानाची व येणाऱ्या विसर्गाची किमान 4 ते 24 तास अगोदर सुचना महसुल यंत्रणेला देणे शक्य होईल. (heavy rain is the main reason of flood in chiplun: report)

संबंधित बातम्या:

महापूर ओसरताच नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी, मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून कृष्णाकाठच्या 22 गावात 14 आरोग्य पथके 

प्रत्येकवेळी नुकसान., जगायचं तरी कसं… भुवनेश्वरवाडीच्या पूरग्रस्तांच्या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व्यथा

Raigad Flood : महाड आणि पोलादपूर तालुक्यात पंचनामे, मृतांच्या नातेवाईकांना मदत सुरु – जिल्हाधिकारी

(heavy rain is the main reason of flood in chiplun: report)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.