Chandrapur Temperature | चंद्रपुरात वीज वितरण यंत्रांनाच कुलर्स, का घेतली जातेय विशेष खबरदारी?

उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढतच आहे. अशाच वीज निर्मिती करणारी यंत्रही बिघण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची काळजी घेतली जावी, यासठी या यंत्रांनाच रामनगर वीज केंद्रात कुलर्स लावण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून उपाययोजना केल्याचं सहायक अभियंता कुणाल पाटील यांनी सांगितलं.

Chandrapur Temperature | चंद्रपुरात वीज वितरण यंत्रांनाच कुलर्स, का घेतली जातेय विशेष खबरदारी?
चंद्रपुरात वीज वितरण यंत्रांनाच कुलर्स लावण्यात आलेत. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 8:31 AM

चंद्रपूर : चंद्रपूरच्या वीज वितरण विभागाने (Power Distribution Department) कडक उन्हाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या यंत्रांना थंड ठेवण्यासाठी कुलर्स लावले आहेत. जिल्ह्यात उन्हाची काहिली प्रचंड वाढल्यानंतर विजेच्या मागणीत परमोच्च वाढ होत आहे. अशा स्थितीत थेट उन्हात -अखंड सुरू राहणारी रोहित्रे बंद पडू नयेत यासाठी चक्क कुलर्सद्वारे थंडावा दिला जातोय. या काळात सर्वोच्च मागणीदरम्यान वीज उपकरणांमध्ये होणारा बिघाड म्हणजे तक्रारी व प्रसंगी आंदोलनाचे वळण घेतो. हे टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून रोहित्राना थंड ठेवण्यासाठी हे अधिकचे उपाय केले जात आहेत. या उपायाने रोहित्रे थंड राखत वीज पुरवठा सामान्यपणे केला जातो, अशी अधिकार्‍यांची माहिती आहे. या उपायाने जिल्हाभर विविध वीज उपकेंद्रात रोहित्रे कायम सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. या उपायांची सध्या चांगलीच चर्चा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रांना कुलर्स लावल्याचं रामनगर वीज वितरण केंद्राचे (Ramnagar Power Distribution Center) सहायक अभियंता कुणाल पाटील (Engineer Kunal Patil) यांनी सांगितलं.

कॅफे मद्रास दुकानाला आग

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध कॅफे मद्रास दुकानाला काल आग लागली. हे शहरातील साउथ इंडियन नाश्त्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे. सकाळी गर्दी असताना अचानक किचनच्या कुलिंग यंत्रणेतून धूर दिसू लागल्यानंतर पळापळ झाली. काही वेळात आगीने रौद्ररूप घेतले. चंद्रपूर शहर मनपाच्या अग्निशमन यंत्रणेने ही आग विझविली. या दुकानाच्या शेजारीच शाळा व मंदिर असल्याने अग्निशमन पथकाला आग वाढण्याची चिंता होती. मात्र अर्ध्या तासातच आग आटोक्यात आणून अग्निशमन पथकाने अभिनंदनीय काम केले. आगीत या जुन्या दुकानाची मात्र मोठी हानी झाली.

पारा 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता

विदर्भात सध्या हिट वेव्ह अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील तीन दिवस पारा 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. विदर्भात सर्वच शहरांचं तापमान 40 अंशावर गेलंय. चंद्रपुरात तर देशात सर्वाधिक 44.2 तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरचा पारा 42 अंशावर गेलाय. जिल्हा प्रशासनानं अलर्ट जारी केलाय. नागपूर महापालिकेनं हिट ऍक्शन प्लान तयार केलाय. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत कामगारांनी काम करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दुपारी सर्व बगीचे सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच शासकीय रुग्णालयात शीत कक्षाची स्थापना करण्यात आलीय. तीन दिवसानंतर मात्र उष्ण लाटांपासून दिलासा मिळणार आहे. कारण पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना एस यांनी वर्तवली.

Chandrapur : दहशत माजवणाऱ्यांच्या तळपायावर फटके देत सगळी मस्ती उतरवली! पोलिसांची दबंग कारवाई

Heat wave in Vidarbha : विदर्भात उष्णतेची लाट; पुढील दोन दिवसांत तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज

Nagpur Murder : नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अल्पवयीन मुलीच्या मदतीने हत्या

Non Stop LIVE Update
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.