AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Corona : तब्बल 700 पेक्षा जास्त गावं कोरोनामुक्त, कोल्हापूरकर कोरोनाला धोबीपछाड देण्याच्या तयारीत

कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur corona update) तब्बल 700 पेक्षा अधिक गावं कोरोनामुक्त झाली आहेत. दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचने अक्षरश: कहर माजवला होता.

Kolhapur Corona : तब्बल 700 पेक्षा जास्त गावं कोरोनामुक्त, कोल्हापूरकर कोरोनाला धोबीपछाड देण्याच्या तयारीत
Kolhapur CPR Hospital
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 12:49 PM
Share

कोल्हापूर : एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आणि तिसऱ्या लाटेची (Corona third wave) भीती असताना, काही जिल्ह्यातून दिलासादायक चित्र येत समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur corona update) तब्बल 700 पेक्षा अधिक गावं कोरोनामुक्त झाली आहेत. दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचने अक्षरश: कहर माजवला होता. कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर हा केवळ राज्यातच नव्हे तर देशात अव्वल होता. शहरांमधून गावा गावांत कोरोना पसरल्यामुळे भीती वाढली होती. मात्र आता गावंच्या गावं कोरोनामुक्त होत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 778 गावात गेल्या पंधरा दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. इतकंच नाही तर भुदरगड तालुक्‍यातील सर्वाधिक 109 गावं कोरोना मुक्त झाली आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोरोना मुक्त गावात शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारचे आदेश येताच या गावांमध्ये शाळांचे वर्ग भरणार आहेत.

दरम्यान, एकीकडे गावं कोरोनामुक्त होत असताना काही गावांमध्ये उद्रेक कायम आहे. करवीर तालुक्यात अजूनही सर्वाधिक 88 गाव कोरोनाबाधित आहेत.

टेस्टिंग, ट्रेसिंग, लसीकरण… कोरोनाला हरविण्याचा मंत्र

दररोज अधिक प्रमाणात होणाऱ्या टेस्टिंगमुळे संसर्गाचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे तसेच जास्त टेस्टिंग झाल्याने लक्षण नसलेले लोकसुद्धा (असिम्टमॅटिक पेशंट) मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे देखील संसर्ग रोखला गेला. शिवाय टेस्टिंगमुळे सौम्य लक्षण असणाऱ्यांना सुद्धा वेळेत उपचार मिळाले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील घटलेलं पहायला मिळत आहे. दुसरीकडे लसीकरण देखील जोरात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. लसीचा पुरवठा कमी झाला तरच लसीकरणात व्यत्यय येतोय नाहीतर एरव्ही लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

केंद्रिय पथकाचा दौरा

केंद्राच्या पथकाने 15 जुलैला कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. पथकाने जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला. चार सदस्यीय पथकाने प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, लसीकरण केंद्रांना देखील भेटी दिल्या. रोजचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू बेडची स्थिती, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, तिसर्‍या लाटेसाठी केलेली तयारी याची सविस्तर माहिती प्रशासनाने या पथकाला दिली.

संबंधित बातम्या  

कोल्हापूरकरांना मोठा दिलासा, तब्बल दोन महिन्यानंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद, मृत्यू संख्याही घटली!

कोल्हापूरची कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईना, थेट केंद्राचं पथक दाखल, आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेणार!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.