VIDEO | ओढ्याच्या पुरातून जाताना बाईक कलंडली, कोल्हापुरात हवाई दलातील जवान वाहून गेला

बाईक पाण्यात जाताच प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे कलंडली. यामध्ये अभिषेक पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. ओढा परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. पण अद्याप त्याचा शोध लागला नाही.

VIDEO | ओढ्याच्या पुरातून जाताना बाईक कलंडली, कोल्हापुरात हवाई दलातील जवान वाहून गेला
कोल्हापूरमधील पुराच्या पाण्याचे प्रातिनिधीक दृश्य
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 10:57 AM

विश्वनाथ येळ्ळुरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : कडलगे-ढोलगरवाडी (ता. चंदगड) या दोन्ही गावालगत असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरातून जाताना भारतीय हवाई दलातील जवान वाहून गेला. कोल्हापूरचा रहिवासी असलेला 26 वर्षांचा अभिषेक संभाजी पाटील वाहून गेला. तर त्याच बाईकवरुन प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील सुदैवाने बचावला.

नेमकं काय घडलं?

अभिषेक हा आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त ढोलगरवाडीला गेला होता. तिथून आपल्या नागरदळे गावी परतत असताना कडलगेच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. त्याची स्प्लेंडर बाईक पाण्यात जाताच प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे कलंडली. यामध्ये अभिषेक पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला.

अभिषेकला पकडून ठेवण्याचा प्रयत्न मित्र शशिकांतने केला, पण पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ते शक्य झाले नाही. पाण्याबाहेर असणाऱ्या काही युवकानी शशिकांत आणि त्यांच्या बाईकला पाण्याबाहेर सुरक्षित काढले. युवक वाहून गेल्याची बातमी परिसरात कळताच ओढा परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. पण अद्याप त्याचा शोध लागला नाही.

या घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाटील यानी यासंदर्भात प्रशासनास सूचना केल्या आहेत. तर कोवाड पोलिस औट पोष्टचे पोलीस कॉन्स्टेबल कुशाल शिंदे यानी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम राबवली.

ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच अपघात

सैन्यदलात दाखल होऊन भारतमातेची सेवा करण्याचे तीव्र स्वप्न अभिषेकने उराशी बाळगले होते. त्यानुसार भारतीय हवाई दलात जॉईन होऊन अभिषेक गेल्या दोन वर्षांपासून सेवा बजावत आहे. तो सुट्टीवर गावी आला होता. पण ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच तो पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तो सुरक्षित रहावा अशीच सर्वजण प्रार्थना करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | पुराच्या पाण्यात बाईक घालण्याचं धाडस अंगलट, कृषी केंद्र संचालकाचा वाहून गेल्याने मृत्यू

चिपळूणमध्ये पुराची पाणीपातळी चार-पाच फुटांनी खाली, पावसाची रिमझिम

(Kolhapur Indian Air Force Soldier flown away in flood water)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.