मारुती साक्षय आमचा, तुम्ही शब्द दिलता, पण दोन वर्ष कुणीच बघितलं नाय आमच्याकडं, आता तुमी परत आलाय; ग्रामस्थानं फडणवीसांना सुनावलं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरची पाहणी करत असताना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. (devendra fadnavis)

मारुती साक्षय आमचा, तुम्ही शब्द दिलता, पण दोन वर्ष कुणीच बघितलं नाय आमच्याकडं, आता तुमी परत आलाय; ग्रामस्थानं फडणवीसांना सुनावलं
devendra fadnavis


कोल्हापूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरची पाहणी करत असताना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. मात्र, हा रोष ठाकरे सरकारविरोधातील नव्हता तर थेट फडणवीस सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन देऊन ते पूर्ण न केल्याचा होता. यावेळी ग्रामस्थांनी थेट फडणवीसांनाच खडेबोल सुनावले. (kolhapur villagers reminded devendra fadnavis his assurance)

देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरातील चिखली गावात जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर हे तिन्ही नेते मारुतीच्या मंदिरात आले. यावेळी पूरग्रस्तांनी प्रचंड गर्दी केली होती. मंदिर आणि मंदिराबाहेरही लोक उभे होते. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी माईकचीही व्यवस्था करण्यात आली होती.

दोन वर्षे कुठं गेलं वो प्रशासन?

फडणवीस यावेळी माईक घेऊन बोलायला उभे राहिले. तितक्यात खिडकीबाहेरून एका व्यक्तिने पोटतिडकीने बोलायला सुरुवात केली. त्याचा संताप, मनातील खदखद हा व्यक्ती व्यक्त करत होता. साहेब, मागच्या टायमाला चंद्रकांतदादा आलते. दादांनी पण शब्द दिलता. नाही म्हणत नाही, दादा तुम्ही शब्द दिला होता याच मंदिरात… मारुती साक्षय आमचा… त्याच्यानंतर दोन वर्षे कुठं गेलं वो प्रशासन?, असा संताप या ग्रामस्थाने व्यक्त केला.

तुम्ही आश्वासन देणार, परत जाणार

त्यानंतर तुम्ही आम्हाला बघितलं नाही. आदित्य ठाकरे साहेब आलते त्यांनी बघितल नाही. कुणीच बघितलं नाही आमच्याकडे दोन वर्षे… आणि आज तुम्ही परत आलाय इथं… आसचं आता तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही साहेब, हे मी आता तुम्हाला उघड इथेच सांगतो, अशी वेदनाही या ग्रामस्थाने बोलून दाखवली. त्यामुळे फडणवीस आणि पाटीलही काळ स्तब्ध झाले होते. (kolhapur villagers reminded devendra fadnavis his assurance)

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन आता करणार नाही, पण…; फडणवीसांनी दिला इशारा

पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

(kolhapur villagers reminded devendra fadnavis his assurance)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI