अशोक चव्हाणांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची FRP थकवली, बळीराजा अडचणीत, संभाजी ब्रिगेडचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकवलीय.

अशोक चव्हाणांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची FRP थकवली, बळीराजा अडचणीत, संभाजी ब्रिगेडचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
राजीव गिरी

| Edited By: Akshay Adhav

Jun 30, 2021 | 8:34 AM

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेडमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने (BhauRao Chavan Sugar Factory) ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकवलीय. त्यामुळे बळीराजा अडचणीत आलाय. थकीत रक्कम देण्याची मागणी संभाजी ब्रिग्रेडने केलीय. संभाजी ब्रिग्रेडने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यात लक्ष घालण्याची मागणी केलीय. (Large amount of FRP to Bhaurao Chavan Sugar factory Farmer in trouble Sambhaji Brigade Statement nanded Collector)

अशोक चव्हाण यांच्या कारखान्याने पैसे थकवले

नांदेडमध्ये भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या मोठ्या रक्कमा थकल्या आहेत. मात्र या साखर कारखण्याकडून थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्या जातेय, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे संभाजी ब्रिग्रेडने आपल्या निवेदनात नमूद केलंय.

संभाजी ब्रिगेडने निवेदनात काय म्हटलंय…?

“भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना या वर्षाची एक रकमी एफआरपीप्रमाणे भाव मिळाला नसल्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. या वर्षी मान्सून सर्वत्र वेळेवर येऊन पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झालेला आहे परंतु चालू वर्षाचे ऊसाची एक रकमी एफआरपी रक्कम शासनाने थकल्यामुळे कारखान्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. सत्ताधारी शासनाने यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घालून शेतकऱ्यांना चालू वर्षांमध्ये गेलेल्या उसाची एक रकमी एफआरपी लवकरात लवकर द्यावी जी की पेरणीच्या अगोदर द्यायला हवी होती. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व गलथान कारभारामुळे आजपर्यंत शेतकऱ्यांना एफ.आर.पी. ची रक्कम मिळालेली नाही.”

नाहीतर संभाजी ब्रिगेडकडून तीव्र आंदोलन

शासनाने लवकरात लवकर एफ. आर. पी. चा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध करून द्यावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडकडून येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम आणि संकेत पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

(Large amount of FRP to Bhaurao Chavan Sugar factory Farmer in trouble Sambhaji Brigade Statement nanded Collector)

हे ही वाचा :

पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर खालच्या भाषेत टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!

अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीची रणधुमाळी, पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज नाही, कुठे होणार पोटनिवडणूक?

पुण्यातील बैठकीचं निमंत्रण दोन तासआधी WhatsApp वर, राष्ट्रवादी शहराध्यक्षांवर महापौर मोहोळ बरसले

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें