VIDEO: शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्ज द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही, आम्हाला फक्त जगवा; चिपळूणच्या व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्र्यासमोर आक्रोश

शेतकऱ्यांच्या धर्तीवर आम्हाला एकदाच कर्ज द्या. पुन्हा कधीच भीक मागणार नाही. आमचे मायबाप तुम्ही आहात. आम्हाला फक्त जगवा, फक्त जगवा. (CM Uddhav Thackeray)

VIDEO: शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्ज द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही, आम्हाला फक्त जगवा; चिपळूणच्या व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्र्यासमोर आक्रोश
CM Uddhav Thackeray


महाड: शेतकऱ्यांच्या धर्तीवर आम्हाला एकदाच कर्ज द्या. पुन्हा कधीच भीक मागणार नाही. आमचे मायबाप तुम्ही आहात. आम्हाला फक्त जगवा, फक्त जगवा, असा टाहोच चिपळूणच्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फोडला. या व्यापाऱ्याचा टाहो ऐकून मुख्यमंत्रीही क्षणभर स्तब्ध झाले. या व्यापाऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत त्यांना मदतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. (Maharashtra CM Uddhav Thackeray reviews flood situation in Chiplun)

काल तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण येथील पुरपरिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी व्यापारी आणि स्थानिकांनी प्रचंड गर्दी होती. मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करत असतानाच एका व्यापाऱ्याने अत्यंत आर्त स्वरात मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या.

यावेळी एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर सर्व व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. पूर आला. त्यात आमचं मोठं नुकसान झालं. आमच्यावर कर्ज आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येते. आम्हालाही शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. व्यापाऱ्यांना आयुष्यात एकदाच कर्जमाफी द्या. त्यानंतर आम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी दोन टक्के व्याजाने तेवढंच कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीही भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला फक्त जगवा, आम्हाला जगवा, असा टाहोच एका व्यापाऱ्याने फोडला. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या व्यापाऱ्याला दिला.

पूर का आला? याचा आढावा घेतला

यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिपळूणमध्ये पूर येण्याची कारणमिमांसाही केली. पाणी अचानक कसं भरलं. पूर का आला याचा आढावा घेण्यात आला आहे. पाणी, पूर तुम्हाला काही नवीन नाही हे मला कुणी तरी सांगितलं. यंदा पूर मोठ्याप्रमाणावर आला. कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. त्यामुळे या पुराचं जलव्यवस्थापन करावं लागेल. तुमच्याकडे पूर येऊच नये तसं व्यवस्थापन करावं लागेल. पण त्याला थोडा अवधी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

महिला मुख्यमंत्र्यासमोरच रडली

एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला मुख्यमंत्र्यांसमोरच धायमोकलून रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. (Maharashtra CM Uddhav Thackeray reviews flood situation in Chiplun)

संबंधित बातम्या:

VIDEO: काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची; मुख्यमंत्र्याकडून व्यापाऱ्यांना दिलासा

VIDEO: काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, महिलेचा मुख्यमंत्र्यांकडे टाहो

VIDEO: कुठलं सरकार? आता कुठं डिस्चार्ज झालाय घरातून, फिरताहेत; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

(Maharashtra CM Uddhav Thackeray reviews flood situation in Chiplun)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI