विधानपरिषदेची रणधुमाळी, अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांकडे विजयाचा जॅकपॉट….! कोण बाजी मारणार?

या मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे धनाढ्य असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या तीन टर्म पासून गोपीकिशन बाजोरिया यांचे वर्चस्व आहे. गेल्या तीन निवडणुका त्यांनी भाजप- सेना युतीच्या वतीने लढविल्या होत्या

विधानपरिषदेची रणधुमाळी, अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांकडे विजयाचा जॅकपॉट....! कोण बाजी मारणार?
गोपीकिशन बाजोरिया, प्रकाश आंबेडकर, वसंत खंडेलवाल


अकोला : अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपाच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा ‘ जॅकपॉट ‘ ठरणार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून आता त्यांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगणार आहे.

मतदारसंघातील पक्षीय बलाबल

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस 190, शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 76 असे एकूण 396 मते आहेत तर 130 तर भाजपाकडे 244 मते आहेत. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार आहेत. हे मतदार आपल्या विजयाचा ‘ जॅकपॉट’ बनू शकतात असा समज उमेदवारांना येताच त्यांनी या मतदारांची मनधरणी सुरू केली असल्याची चर्चा आहे.

वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीनं चुरस वाढळी

या मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे धनाढ्य असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या तीन टर्म पासून गोपीकिशन बाजोरिया यांचे वर्चस्व आहे. गेल्या तीन निवडणुका त्यांनी भाजप- सेना युतीच्या वतीने लढविल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीकडे भाजपच्या तुलनेत मतदार अधिक होते. परंतु, अपक्षांसह अन्य पक्षातील मतदारांना ऐनवेळी मॅनेज करण्याचे कसब बाजोरिया यांना चांगलेच अवगत आहे. यावेळी मात्र राज्यातील पक्षीय समीकरण बदलल्याने बाजोरिया हे महाविकास आघाडीकडून या निवडणूक रिंगणात उतरले. यंदा त्यांचाकडे असलेले संख्याबळ बघता त्यांना मागीलप्रमाणे फार रसद पुरविण्याचे काम नसल्याचे निवडणुकीपूर्वी बोलले जात होते. परंतु, भाजपाकडून वसंत खंडेलवाल यांची उमेदवारी जाहीर होताच या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

वंचित बहुजन आघाडीची मत निर्णायक

वसंत खंडेलवाल यांचे तिन्ही जिल्ह्यात सामाजिक तथा व्यापारीक असे संबंध आहेत. त्यासोबतच सौम्य व मितभाषी म्हणून त्यांची ओळख आहे. मतदारसंघात फ्रेश चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असले तरी त्यांना या निवडणुकीचा ही बराच अनुभव असल्याचे बोलले जात आहे. मतदारांना आपल्याकडे वळविण्याची कला त्यांच्यात आहे. यासोबतच या निवडणुकीत त्यांनी ‘ विरोधकाचा विरोधक आपला मित्र ‘ हा फार्मुला चालविला असल्याने त्यांना पक्षांतर्गत विरोधकांची साथ लाभणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजयाचा ‘ मॅजिक आकडा ‘ गाठण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी ‘ जॅकपॉट ‘ समजल्या जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा वाशिम मतदारसंघासाठीची मतदार यादी मंगळवारी जाहीर झाली आहे. 822 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दावे व हरकती निवडणूक मागितल्यानंतर विभागाने अंतिम यादी जाहीर केली असून अकोला जिल्ह्यात 287, वाशिम 168 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 367 मतदार आहेत.यात 385 पुरुष तर 437 स्त्री मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा निर्णायक ठरणार आहे. राज्यात महाविकास विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक होत आहे. पण या निवडणुकीत सर्वांच लक्ष हे वंचित बहुजन आघाडी कडे आहे.कारण वंचित बहुजन आघाडी कोणाकडे आपला कौल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी आहे जिल्हानिहाय मतदार संख्या

1) अकोला : जिल्हा परिषद मतदार , – मतदारांची अकोला – 60… अकोला महानगरपालिका – 81… अकोट नगरपरिषद – 36… तेल्हारा नगरपरिषद – 19 , बाळापूर नगरपरिषद – 26…. पातूर नगरपरिषद – 19…. मूर्तिजापुर नगरपरिषद – 26….बार्शीटाकळी नगरपंचायतचे 20 मतदार आहेत.

2) वाशिम: जिल्हा परिषद – 58… नगरपरिषद – 34… नगरपरिषद परिषद कारंजा – 32….. नगर परिषद मंगरुळपीर – 21….रिसोड नगर परिषदेचे 23 मतदार आहेत….

3) बुलडाणा : जि.प.बुलडाणा 71… नगरपरिषद बुलडाणा 31…. नगर परिषद चिखली – 30…. नगर परिषद देऊळगाव राजा – 21…. नगर परिषद सिंदखेड – 19 … नगर परिषद लोणार – 20 … नगर परिषद मेहकर – 27… नगर परिषद खामगाव – 37… नगर परिषद शेगाव – 32 … नगर परिषद जळगाव जामोद – 21… नगर परिषद नांदुरा – 26 आणि मलकापूर नगर परिषदेतील 32 सदस्य मतदान करणार आहेत….!

इतर बातम्या:

संपात दुही : पडळकर-खोतांना आझाद केले, विलीनीकरणासाठी डंके की चोट पे आंदोलन, नवे नेतृत्व सदावर्तेंचा इशारा!

नवाब मलिकांना कोर्टाचा झटका, वानखेडे कुटुंबावर आता वक्तव्य, आरोप करण्यावर बंदी

Maharashtra MLC election 2021 Akola Washim Buladana constituency Vanchit Bahujan Aghadi will key factor to decide who win Shivsena or BJP

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI