AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीत कोसळधार, 24 तासात 102 मिमी पाऊस, हवामान विभागाकडून रेड ॲलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलीमीटरच्या सरासरीचा आकडा गाठलाय. अजून जुलै महिन्याचे 10 दिवस बाकी असताना 1 जूनपासून आजपर्यत पावसानं 1939 मिलीमीटरचा टप्पा गाठलाय.

रत्नागिरीत कोसळधार, 24 तासात 102 मिमी पाऊस, हवामान विभागाकडून रेड ॲलर्ट
Rain update
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 1:49 PM
Share

रत्नागिरी: गेल्या आठ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा पहायला मिळतायत. सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारनंतर पुन्हा एकदा सरींवर कोसळण्यास सुरवात केलीय. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलीमीटरच्या सरासरीचा आकडा गाठलाय. अजून जुलै महिन्याचे 10 दिवस बाकी असताना1 जूनपासून आजपर्यत पावसानं 1939 मिलीमीटरचा टप्पा गाठलाय.

24 तासात 102 मिमी पाऊस

गेल्या चौवीस तासात सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात 102 मिलीमीटर झालाय. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यत 1265 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला होता.आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. दुपारानंतर सरींवर पाऊस कोसळतोय. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहतायत.

अर्जुना धरणाचा उजा कालवा फुटला

राजापूर तालुक्यातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला आहे. धोधो कोसळणाऱ्या कालवा तुडूंब भरला आणि तो खुटून वाहू लागला. मुख्य बाब म्हणजे सहाच महिन्यापूर्वी या कालव्याचं काम करण्यात आलं होतं. दरम्यान, याबाबत प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास इथले नागरिक आणि गुरं, जनावरांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे.

जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

गेल्या चोवीस तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला बसला असून खेड तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून तालुक्यातील महत्त्वाच्या अशा जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड-दापोली मार्गावरील मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने खबरदारी म्हणून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली तर जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केल्याने बाजारपेठेतील नागरिकांना आणि सकल भाग परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पेणच्या गणपती मूर्ती कारखान्याला फटका

गेले दोन तीन दिवस मुसळधार पावसाचा फटका मुंबई सह रायगड,  रत्नागिरी सारख्या जिह्यांना बसला. त्याचाचा मोठा फटका पेण मधल्या गणपती मूर्तींच्या  कारखान्याला बसला आहे.  कारखान्यात पुराचे पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गणपती मुर्तींचे नुकसान झालेले दिसत आहेत. गावाजवळ असलेल्या दादर खाडीला पूर आला की ते पाणी गावाच्या हद्दीत शिरते आणि मोठ्या प्रमाणात नुकसानाला ग्रामस्थांना आणि मूर्तीकारांना सामोरे जावे लागते.

इतर बातम्या: 

Mumbai rains: मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून 6 हजार कोटी खर्च, तरीही मुंबई पाण्यात; वाचा सविस्तर

Mumbai Rains: मुंबईत पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमानी वैतागले

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.